ETV Bharat / state

सत्ता कोणाच्या बापाची जहागीरदारी नाही; मंत्री वडेट्टीवार यांचा नारायण राणे यांना टोला - Minister Vijay Wadettiwar news

केंद्रीय मंत्री नारायण राणे यांनी आम्ही राज्यात वेटींगवर आहोत असं वक्तव्य केलं होतं. त्यांच्या या वक्तव्याचा देखील त्यांनी समाचार घेतला.

Minister Vijay Wadettiwar
मंत्री विजय वडेट्टीवार
author img

By

Published : Aug 7, 2021, 6:37 PM IST

Updated : Aug 7, 2021, 7:02 PM IST

जालना - ओबीसींमुळे मंत्री झालो असून, मंत्रिपद ही काही बापाची खासगी जहागीरदारी नाही. त्यामुळे ओबीसीसाठी मंत्रिपद खपले तरी चालेल, असे राज्याचे मदत आणि पुनर्वसन मंत्री विजय वडेट्टीवार यांनी म्हटले आहे.

महादेव जानकर नेते, रासप

जालन्यातील दादडगाव येथे मंडल आयोग लागू दिनानिमित्त सामाजिक न्याय मेळावा घेण्यात आला. या मेळाव्यात ते बोलत होते. केंद्रीय मंत्री नारायण राणे यांनी आम्ही राज्यात वेटींगवर आहोत असं वक्तव्य केलं होतं. त्यांच्या या वक्तव्याचा देखील त्यांनी समाचार घेतला. राणे वेटींगवर आहेत, मग आम्ही काय ऑक्सिजनवर आहोत का? असा टोला लगावत सत्ता ही कुणाच्या बापाची जहागीरदारी नाही, असे मंत्री वडेट्टीवार यांनी सांगितले.

विजय वडेट्टीवार - मंत्री मदत आणि पुनर्वसन

राज्यातील प्रत्येक राजकीय पक्षाने ओबीसींची जातनिहाय जनगणना होण्यासाठी ठराव करावा अशी मागणी राष्ट्रीय समाज पक्षाचे नेते आणि माजी मंत्री महादेव जानकर यांनी केली. या कार्यक्रमाला माजी केंद्रीय मंत्री बबनराव ढाकणे यांचीही प्रमुख उपस्थिती होती.

हेही वाचा - देशाला सतत आगे बढो म्हणणारा कंडक्टरसारखा पंतप्रधान हवा; मुख्यमंत्री ठाकरेंचा मोदींना टोला

Last Updated : Aug 7, 2021, 7:02 PM IST
ETV Bharat Logo

Copyright © 2025 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.