जालना - राज्यामध्ये सध्या कोणी कोणावर काय आरोप करील आणि कोणत्या शब्दात अपमान करेल, याचे तारतम्य राहिलेले नाही. असंवैधानिक भाषा वापरून एक दुसऱ्याबद्दल चिखलफेक सुरू आहे. आमदार राणे यांनी नुकतेच विनायक राऊत यांना 'टॉमी' म्हटले आहे. त्या पार्श्वभूमीवर मंत्री अब्दुल सत्तार बोलत होते.
हेही वाचा - लग्न तोडल्याने तरुणी, तिच्या आईचे अपहरण, तरुणाला अटक
पंधरा वर्षांपासून वाढले प्रस्थ
'राजकारणामध्ये वैयक्तिक हेवेदावे दूर ठेवून काम केले पाहिजे, त्यासाठी कोणती भाषा वापरली पाहिजे याचे देखील भान ठेवायला हवे, असंवैधानिक भाषा वापरणे चुकीचे आहे. गेल्या पंधरा वर्षांपासून हा प्रकार वाढलेला आहे. ज्या आमदारांनी विनायक राऊत यांना 'टॉमी' म्हटले आहे. त्यांना आम्हीदेखील त्याच भाषेत उत्तर देऊ शकतो. मात्र, आत्ताच उत्तर देणे योग्य होणार नाही. वेळ आल्यानंतर त्यांना याचे उत्तर देऊ,' असा टोलाही राज्यमंत्री अब्दुल सत्तार यांनी आमदार राणे यांना मारला.
पोलीस तपासात निष्पन्न होईल
आमदार धनंजय मुंडे यांच्यावर विनयभंगाचा गुन्हा दाखल झाला आहे. त्यासंदर्भात योग्य ती माहिती आमदार मुंडे यांनी पोलिसांना दिलेलीच आहे. दोघांचे संगनमत असेल तर काय प्रकार आहे, ते लवकरच पोलीस तपासात पुढे येईल आणि त्या संदर्भात पोलीस तपास करीत असल्याचेही मंत्री अब्दुल सत्तार यांनी ईटीव्हीशी बोलताना सांगितले.
हेही वाचा - राष्ट्रवादीचे प्रवक्ते नवाब मलिकांच्या जावयाची एनसीबी चौकशी