ETV Bharat / state

कोणताही शेतकरी मदतीपासून वंचित राहणार नाही - महसूल राज्यमंत्री सत्तार - अब्दुल सत्तार यांचा जालना दौरा न्यूज

महसूल राज्यमंत्री अब्दुल सत्तार यांनी माजी मंत्री अर्जुनराव खोतकर आणि शिवसेनेचे जिल्हाप्रमुख भास्कर आंबेकर यांना सोबत घेऊन जालना तालुक्यातील अंतरवाला आणि कुंभेफळ या गावच्या शिवारातील पिकांची पाहणी केली.

minister abdul sattar visit to Jalna district and met flood-affected people
नुकसान भरपाईत कोणताही शेतकरी मदतीपासून वंचित राहणार नाही, याची खात्री सरकार घेणार - महसूलमंत्री सत्तार
author img

By

Published : Oct 19, 2020, 2:33 PM IST

Updated : Oct 19, 2020, 2:47 PM IST

जालना - महसूल राज्यमंत्री अब्दुल सत्तार यांनी माजी मंत्री अर्जुनराव खोतकर आणि शिवसेनेचे जिल्हाप्रमुख भास्कर आंबेकर यांना सोबत घेऊन जालना तालुक्यातील अंतरवाला आणि कुंभेफळ या गावच्या शिवारातील पिकांची पाहणी केली. नुकसान झालेल्या शेतकऱ्यांना शासनाकडून मदत मिळेलच, असे अब्दुल सत्तार यांनी स्पष्ट केले. भेंडी, सोयाबीन, कापूस, मका आदी पिकांचे नुकसान झाल्याचे शेतकऱ्यांनी मंत्र्यांच्या निदर्शनास आणून दिले. गोलापांगरीचे शेतकरी मनोज मोरे, नामदेव जराड, राजेंद्र आदे, शेख लालाभाई, अंतरवाला येथील शेतकरी कल्याणराव पडूळ, कुंभेफळचे शेतकरी ईश्वर सोनाजी काटकर, सुभाष आप्पा काटकर, सुदाम कोरडे आदी शेतकऱ्यांच्या शेतीची पाहणी केली.

राज्यमंत्री अब्दुल सत्तार बोलताना...

यावेळी मंत्री अब्दुल सत्तार म्हणाले की, माजी मंत्री अर्जुनराव खोतकर आणि शिवसेनेचे जिल्हा प्रमुख भास्कर अंबेकर यांनी जालना तालुक्यासह जालना जिल्ह्यातील शेतकऱ्यांच्या शेतीच्या झालेल्या नुकसानासंदर्भात मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्याकडे व्यथा मांडली होती. याची दखल घेत मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी महसूल राज्यमंत्री या नात्याने माझ्यावर जिल्ह्यात बांधावर जाऊन शेतकऱ्यांच्या नुकसानाची पाहणी करण्याचे आदेश दिले होते.

उद्धव ठाकरे यांच्या आदेशानुसार, आज कुंभेफळ, अंतरवाला या गावाच्या शिवारातील भेंडी, सोयाबीन, कापूस, मका, तसेच फळबागाच्या झालेल्या नुकसानीची पाहणी केली आहे. या पाहणीतून सर्व चित्र लक्षात आले आहे आणि या संदर्भात उपविभागीय अधिकारी तहसीलदार यांना सर्व पंचनामे करण्याचे आदेश दिलेले आहेत. जे कुणी सुटले असतील त्यांचेही पंचनामे करावेत, असेही सुचविलेले आहे. त्यामुळे कोणताही शेतकरी मदतीपासून वंचित राहणार नाही, याची खात्री सरकार घेणार असल्याचे सत्तार यांनी सांगितले.

महसूल राज्यमंत्री अब्दुल सत्तार यांच्या दौऱ्यामध्ये त्यांच्यासोबत जिल्हा परिषदेचे उपाध्यक्ष महेंद्र पवार, जिल्हा परिषद सदस्य जयमंगल जाधव, तालुका प्रमुख संतोष मोहिते, शिवसेना तालुका प्रमुख जयप्रकाश चव्हाण, जालना बाजार समितीचे संचालक बाबा मोरे, जालना शहर प्रमुख विष्णू पाचफुले, आत्मानंद भक्त आदी कार्यकर्त्यांची उपस्थिती होती.

Last Updated : Oct 19, 2020, 2:47 PM IST
ETV Bharat Logo

Copyright © 2025 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.