ETV Bharat / state

Rajesh Tope to ST Workers : 'एसटी संप जास्त ताणू नका'; आरोग्यमंत्री राजेश टोपेंचं एसटी कर्मचाऱ्यांना आवाहन - राजेश टोपेंचे एसटी कर्मचाऱ्यांना आवाहन

एसटी कर्मचाऱ्यांच्या मागण्यांसंदर्भात मुख्यमंत्री उद्धव ठाकरे ( CM Uddhav Thackeray ), उपमुख्यमंत्री अजित पवार ( Dy CM Ajit Pawar ) यांच्यासह परिवहनमंत्री अनिल परब ( Transport Minister Anil Parab ) यांच्याशी चर्चा करणार आहे. आता एसटी चालवण्यासाठी बाहेरुन कर्मचारी बोलवावे लागत आहे. त्यामुळे एसटी कर्मचाऱ्यांनी संप जास्त ताणू नये, असे आवाहन आरोग्यमंत्री राजेश टोपे ( Health Minister Rajesh Tope to ST Workers ) यांनी एसटी कर्मचाऱ्यांना केले.

Rajesh Tope
राजेश टोपे
author img

By

Published : Feb 28, 2022, 12:29 PM IST

जालना - एसटी कर्मचाऱ्यांच्या मागण्यांसंदर्भात मुख्यमंत्री उद्धव ठाकरे ( CM Uddhav Thackeray ), उपमुख्यमंत्री अजित पवार ( Dy CM Ajit Pawar ) यांच्यासह परिवहनमंत्री अनिल परब ( Transport Minister Anil Parab ) यांच्याशी चर्चा करणार आहे. आता एसटी चालवण्यासाठी बाहेरुन कर्मचारी बोलवावे लागत आहे. त्यामुळे एसटी कर्मचाऱ्यांनी संप जास्त ताणू नये, असे आवाहन आरोग्यमंत्री राजेश टोपे ( Health Minister Rajesh Tope to ST Workers ) यांनी एसटी कर्मचाऱ्यांना केले.

प्रतिक्रिया

जालना जिल्ह्यातील संपावर असलेल्या एसटी कर्मचाऱ्यांनी आज राजेश टोपे यांची भेट घेऊन त्यांच्या मागण्यांसंदर्भात चर्चा केली. त्यानंतर टोपे यांनी हे आवाहन केलं. याआधी देखील परिवहन मंत्र्यांनी एसटी कर्मचाऱ्यांशी चर्चा केली आहे. मंत्रिमंडळाच्या बैठकीत एसटी कर्मचाऱ्यांच्या प्रश्नांसंदर्भात चर्चा केली जाणार आहे. एसटी कर्मचाऱ्यांनी संप जास्त न ताणता चर्चेने मार्ग काढण्यासाठी पुढाकार घ्यावा, असेही ते म्हणाले. परिवहन मंत्री अनिल परब यांच्याशी देखील या मागण्यांसंदर्भात चर्चा केली जाईल असं आश्वासन देखील टोपे यांनी दिलं.

महामंडळाचे तब्बल 1, 600 कोटी रुपयांचे नुकसान -

एसटी महामंडळ विलीनीकरणाच्या मागणीवरुन सुरू असलेला संप चांगलाच ( ST employees strike ) चिघळला आहे. सर्वसामान्य नागरिकांची मोठ्या प्रमाणात गैरसोय होत आहे. या संपामुळे एसटी महामंडळाचे तब्बल 1, 600 कोटी रुपयांचे ( Economic loss of State Transport ) नुकसान झाले आहे. एसटीच्या 82 हजार 498 कर्मचाऱ्यांपैकी 54 हजार 396 कर्मचारी अजूनही ( ST employees in Strike ) संपात सहभागी आहेत.

हेही वाचा - Agitation OF Sambhaji Raje : छत्रपती संभाजी राजेंना चर्चेसाठी निमंत्रण; शिष्टमंडळ 'वर्षा'वर दाखल

दरम्यान, विलीनीकरणाचा संदर्भात मुंबई उच्च न्यायालयात सुनावणी ( Hearing on ST in high court ) झाली आहे. न्यायालयातील पुढील सुनावणी 11 मार्च रोजी होणार आहे. या पार्श्वभूमीवर आझाद मैदानावर सुरू असलेल्या आंदोलनातील एसटी कर्मचारी ( ST employees agitation in Azad ground ) आक्रमक झाले आहेत. गेल्या साडे तीन महिन्यांपासून एसटी महामंडळ विलीनीकरणाच्या मागणीवरून एसटी कर्मचाऱ्यांचा संप सुरू आहे.

ETV Bharat Logo

Copyright © 2025 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.