ETV Bharat / state

Maratha Reservation : मराठा आरक्षणासाठी मुख्यमंत्र्यांनी बोलावली सर्वपक्षीय बैठक; मनोज जरांगे म्हणाले...

Maratha Reservation : राज्यात गेल्या 13 दिवसांपासून मराठा आरक्षणाचा मुद्दा चर्चेत आहे. या पार्श्वभूमीवर मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी उद्या, 11 सप्टेंबरला मुंबईतील सह्याद्री अतिथीगृहावर सर्वपक्षीय बैठक बोलावली आहे.

Maratha Reservation
Maratha Reservation
author img

By ETV Bharat Marathi Team

Published : Sep 10, 2023, 10:47 PM IST

मनोज जरांगे यांची प्रतिक्रिया

जालना Maratha Reservation : मराठा आरक्षणासाठी आंदोलक मनोज जरांगे पाटील हे गेल्या 13 दिवसांपासून जालना जिल्ह्यातील अंतरवली सराटी गावात उपोषणाला बसले आहेत. मनोज जरांगे यांच्या उपोषणामुळं मराठा आरक्षणाचा मुद्दा ऐरणीवर आला आहे. या पार्श्वभूमीवर मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी उद्या, 11 सप्टेंबर रोजी मुंबईतील सह्याद्री अतिथीगृहावर सर्वपक्षीय बैठक बोलावली आहे. गोरगरिबांच्या मुलांना आरक्षण कसं मिळणार, याचा विचार बैठकीत करावा, अशी विनंती मनोज जरांगे पाटील यांनी केलीय. ते माध्यमांशी बोलत होते.

आमच्या वेदना घेऊन सभेला जा : उद्या मुंबईत मराठा आरक्षणाबाबत सर्वपक्षीय बैठक झाली, तर मी त्यांना कळकळीची विनंती करतो की, गोरगरिबांच्या मुलांना आरक्षण कसं मिळेल याचा विचार करावा. मराठा मुलांचं घर, त्या मुलांचं गाव, मुलांच्या शेतात राबणाऱ्या वडिलांचा विचार करायला हवा. गरीब मुलांच्या वडिलांचे स्वप्न असते की, आपल्या मुलाला कुठेतरी नोकरी मिळेल. तुम्ही त्याच्या स्वप्नाचा विचार करा. तुम्ही त्याचे वडील व्हा, त्याचे पालक व्हा, त्याचा विचार करा. तुम्ही आशीर्वाद म्हणून आरक्षणावर तोडगा काढा. आमच्या वेदना, आमचं प्रश्न घेऊन सभेला जा. उद्याची सभा यशस्वी करा. मी तुला नमन करेन, असं असं जरांगे पाटलांनी म्हटलंय.

मुख्यमंत्र्यावर आमचा विश्वास : "मी एक पाऊल मागे घेत त्यांचा मुख्यमंत्र्यांचा सन्मान केला. त्यांनी ज्या त्रुटी आहेत त्या पूर्ण करू, असं आश्वासन दिलं आहे. आम्ही त्यांच्या निर्णयाची वाट पाहत आहोत. 2004 च्या शासन निर्णयाची अंमलबजावणी करा, असं आमचं मत आहे. त्यावर आम्ही समाधानी आहोत. आमचा मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्यावर पूर्ण विश्वास आहे, ते आमची मागणी पूर्ण करतील, अशी अपेक्षा मनोज जरांगे पाटलांनी व्यक्त केलीय.

हेही वाचा -

  1. Maratha Reservation : ...तर दुसरं मणिपूर महाराष्ट्रात होईल, सरकारनं योग्य भूमिका घ्यावी ; ओबीसी जनमोर्चाचा इशारा
  2. Maratha Reservation : मराठा-ओबीसी वाद पेटणार; 11 सप्टेंबरपासून ओबीसी समाजाचं आमरण उपोषण
  3. Legal expert opinion On Maratha Reservation: मराठवाड्यातील मराठा समाजाला कुणबीचे दाखले मिळू शकतात का? जाणून घ्या कायदेतज्ज्ञांच मत

ETV Bharat Logo

Copyright © 2024 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.