ETV Bharat / state

Maratha Protest : जालन्यामध्ये आरक्षणाच्या मागणीसाठी रेल्वे रोको, तासभर वाहतूक खोळंबली - जालन्यामध्ये रेल्वे रोको

Maratha Protest : मराठा आरक्षणाच्या मागणीसाठी सुरू असलेल्या आंदोलनानं मराठवाड्यात पेट घेतलाय. जालना जिल्हायत आरक्षणाच्या मागणीसाठी आंदोलकांनी रेल्वे रुळावर तळ ठोकला. यामुळे सुमारे तासभर वाहतूक खोळंबली होती.

Maratha Protest
Maratha Protest
author img

By ETV Bharat Marathi Team

Published : Oct 30, 2023, 10:05 PM IST

जालना Maratha Protest : राज्यभरात सुरू असलेल्या मराठा आंदोलनाचा फटका आता रेल्वेलाही बसलाय. आंदोलकांनी सोमवारी (३० ऑक्टोबर) जालना जिल्ह्यातील बदनापूर रेल्वे स्थानकावर रेल रोको केला. यामुळे छत्रपती संभाजीनगर ते हैदराबाद जाणारी पॅसेंजर गाडी सुमारे पाऊण तास थांबली होती.

आंदोलकांनी रेल्वे रुळावर तळ ठोकला : मराठा आरक्षणाच्या मागणीसाठी आंदोलकांनी रेल्वे रुळावर तळ ठोकला होता. आंदोलक शेलगाव येथील ७२ नंबर रेल्वे गेटवर थांबले होते. या ठिकाणी ते पॅसेंजर गाडीला थांबवून रेल रोको करणार होते. यावेळी मराठा आंदोलकांनी जोरदार घोषणाबाजीही केली. शेकडो आंदोलक रेल्वे रुळांवर बसले होते. यामुळे रेल्वे प्रशासनाची चांगलीच धावपळ झाली.

पोलिसांनी समजूत काढली : आंदोलक रेल रोको करणार असल्याची माहिती रेल्वे प्रशासन आणि स्थानिक पोलिसांना मिळाली. त्यानंतर रेल्वे प्रशासनानं छत्रपती संभाजीनगरहून हैदराबादला जाणाऱ्या गाडीला बदनापूर रेल्वे स्थानकावरच थांबवून ठेवलं. यानंतर पोलिसांनी रेल्वे गेटवर येऊन आंदोलकांची समजूत काढली. पोलिसांनी आंदोलकांची मनधरणी करत त्यांचं निवेदन स्वीकारलं. त्यानंतर बदनापूर रेल्वे स्थानकावरून पॅसेंजर गाडी सोडण्यात आली. या रेल रोकोमुळे सुमारे एक तास रेल्वेची वाहतूक खोळंबली होती.

बीडमध्ये संचारबंदी : दरम्यान, मराठा आरक्षणाच्या आंदोलनाला बीडमध्ये हिंसक वळण लागलंय. आंदोलकांनी सोमवारी आमदार प्रकाश सोळंके आणि आमदार संदीप क्षीरसागर यांच्या घराला आग लावली. आंदोलकांनी राष्ट्रवादीचं बीडमधील कार्यालय आणि माजलगाव नगर परिषदही पेटवून लावली आहे. यामुळे बीडमध्ये काही काळ तणावाचा वातावरण निर्माण झालं होतं. यानंतर आता बीडमध्ये संचारबंदी लागू करण्यात आली आहे. जिल्हाधिकारी दिपा मुधोळ-मुंडे यांनी हे आदेश जारी केले.

हेही वाचा :

  1. Maratha Protest : बीडमध्ये मराठा आंदोलनात राडा! आमदार संदीप क्षीरसागर यांचं घर पेटवलं
  2. Maratha Protest : आमदार प्रकाश सोळंकेंचं घर जाळल्यानंतर जरांगे पाटलांची पहिली प्रतिक्रिया, एकेरी उल्लेख करत म्हणाले...
  3. Maratha Protest : 'मराठे कोणाच्या वाट्याला जात नाही, पण तुम्ही आमच्या वाट्याला गेला तर...', जरांगे पाटलांचा सरकारला इशारा

ETV Bharat Logo

Copyright © 2025 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.