ETV Bharat / state

जालन्यात कोरोना रुग्णलाय सुरू, दानशुरांकडून रुग्णालय उभारण्यासाठी भरभरून मदत - कोरोना अपडेट

सामान्य रुग्णालयाच्या समोरच असलेल्या इमारतीमध्ये हे रुग्णालय उभारले आहे. दीडशे खाटांचे हे रुग्णालय आहे असून युद्धपातळीवर काम होऊन सुरूही झाले आहे. जिल्हाधिकारी रवींद्र बिनवडे यांनी सामाजिक संस्थांना या कोरोना रुग्णालयासाठी मदत मागितली आणि पाहता पाहता करोडो रुपयांची मदत उभी राहिली. मात्र, कोणाकडूनही रोख रक्कम घेणार नाही, असे प्रशासनाने सांगितले. त्यामुळे रुग्णालयासाठी लागणारे साहित्य संस्थांनी द्यावे, असे नियम घालून दिले.

corona hospital jalna  कोरोना रुग्णालय जालना  कोरोना अपडेट  दानशूर मदत कोरोना रुग्णालय
जालन्यात कोरोना रुग्णलाय सुरू, दानशुरांकडून रुग्णालय उभारण्यासाठी भरभरून मदत
author img

By

Published : Apr 21, 2020, 2:56 PM IST

जालना - जिल्ह्यात कोरोना संकटाशी सामना करण्यासाठी प्रशासनाने स्वतंत्र कोरोना रुग्णालयाची उभारणी केली आहे. शासकीय पातळीवर या रुग्णालयाची उभारणी होत असली तरी प्रशासनाने केलेल्या आवाहनाला प्रतिसाद देत आणि आपली सामाजिक बांधिलकी जपत जालन्यातील नव्हे तर औरंगाबाद जिल्ह्यातील दानशूरांनी देखील या रुग्णालयासाठी भरभरून मदत केली आहे.

जालन्यात कोरोना रुग्णलाय सुरू, दानशुरांकडून रुग्णालय उभारण्यासाठी भरभरून मदत
सामान्य रुग्णालयाच्या समोरच असलेल्या इमारतीमध्ये हे रुग्णालय उभारले आहे. दीडशे खाटांचे हे रुग्णालय आहे असून युद्धपातळीवर काम होऊन सुरूही झाले आहे. जिल्हाधिकारी रवींद्र बिनवडे यांनी सामाजिक संस्थांना या कोरोना रुग्णालयासाठी मदत मागितली आणि पाहता पाहता करोडो रुपयांची मदत उभी राहिली. मात्र, कोणाकडूनही रोख रक्कम घेणार नाही, असे प्रशासनाने सांगितले. त्यामुळे रुग्णालयासाठी लागणारे साहित्य संस्थांनी द्यावे, असे नियम घालून दिले. त्या अनुषंगाने अप्पर जिल्हाधिकारी रवींद्र परळीकर यांच्याकडे सर्व बाबींचे नियोजन सोपविण्यात आले. दानशूरांनी आत्तापर्यंत केलेल्या मदतीमध्ये मोठा वाटा हा जालन्यातील स्टील इंडस्ट्रीचा आहे. यामध्ये 15 व्हेंटीलेटर ज्यांची बाजारामध्ये 1 कोटी 65 लाख रुपये एवढी किंमत आहे. तसेच 262 बेड दिले आहेत. रुग्णालयाला दिलेल्या या वस्तूंविषयी जालना स्टील मॅन्युफॅक्चर्स असोसिएशनचे अध्यक्ष घनश्यामदास गोयल यांनीही दुजोरा दिला आहे. त्यानंतर जॉन्सन अँड जॉन्सन 2 लाख तीन पदरी मास्क, पीपीई किट, मारीको इंडस्ट्रीजने 40हजार बिस्कीट पुडे, औरंगाबाद येथील उद्योजकांनी 100 बेड यासह अन्य काही जणांनी N-95 प्रकारचे 28 हजार मास्क, अडीच हजार लिटर सॅनीटायझर अशा अनेक विविध प्रकारची मदत केली आहे.

ETV Bharat Logo

Copyright © 2025 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.