ETV Bharat / state

Manoj Jarange Patil News: मराठ्यांना आतापर्यंत सर्वांनी फसवलं, आजपासून पाणीही सोडणार - मनोज जरांगे

सर्वपक्षीय बैठकीत मनोज जरांगे यांनी उपोषण मागं घ्यावं, असं आवाहन केलं आहे. मात्र, मनोज जरांगे यांनी आंदोलन सुरुच ठेवणार असल्याचा निश्चय व्यक्त केला.

Manonj Jaragne Patil News
Manonj Jaragne Patil News
author img

By ETV Bharat Marathi Team

Published : Nov 1, 2023, 2:28 PM IST

Updated : Nov 1, 2023, 4:54 PM IST

जालना : मनोज जरांगे पाटील यांच्या आंदोलनाचा आज आठवा दिवस आहे. सर्वपक्षीय बैठकीतून मनोज जरांगे पाटील यांना उपोषण मागे घेण्याची विनंती केली. त्यावर जरांगे पाटील यांनी प्रतिक्रिया दिली आहे. सरकारनं अध्यादेश रद्द करावा. सरकारला वेळ द्यायचा की नाही हे सरकारशी बोलून ठरवू. मी चुकीच करणार नाही, मग तुम्ही योग्य करणार का? सरकारला वेळ दिला म्हणजे आरक्षण मिळणार का? गरिबांवर गुन्हे दाखल करण्यात येत आहेत. वेळ दिल्यावर सरसकट आरक्षण देण्यात येणार का? आरक्षण मिळेपर्यंत आंदोलन थांबविणार नाही. वेळ कशासाठी पाहिजे ते सांगा, असे प्रश्न जरांगे यांनी उपस्थित केले आहेत.

मनोज जरांगे पाटील आंदोलनावर ठाम : आम्हाला अर्धवट आरक्षण नको आहे. मी उपोषणाला बसल्यानंतर 7 ते 8 दिवसांनी वेळ मागत आहात. आपण आरक्षण कसं देणार हे सांगा. मराठा समाजाचा किती अंत पाहणार आहात. मी चर्चेसाठी बोलावूनही सरकार चर्चेसाठी आलं नाही. फडणवीस यांनी यावं मराठे अडविणार नाहीत. आजपासून मी पाणी प्यायचं सोडणार आहे. शांततेचं युद्ध आता सरकारला पेलवणार नाही. कोणताही पक्ष आपाला नाही. मराठ्यांना राजकीय नेत्यांनी वेड्यात काढल्याचं जरांगे यांनी म्हटलंय.

मराठ्यांना आरक्षण मिळाले पाहिजे : राज्यातील सर्व पक्ष एकत्र काम करण्यास तयार आहेत. इतर समाजावर अन्याय न करता मराठ्यांना आरक्षण मिळालं पाहिजे यावर सर्व पक्षांनी एकमत दर्शवलं आहे. मराठा आरक्षणासाठी मागासवर्गीय आयोग युद्धपातळीवर काम करत आहे, मनोज जरांगे यांनी सरकारला थोडा वेळ द्यावा, मराठा समाजानं संयम राखावा, मनोज जरांगे यांनी सरकारला सहकार्य करावं, असं मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी म्हटलं आहे.

कायमस्वरूपी आरक्षण देऊ : आम्ही मराठा समाजाला कायमस्वरूपी आरक्षण देऊ, असं मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी म्हटलं आहे. आम्ही आरक्षणाच्या बाजूनं आहोत. सुप्रीम कोर्टात क्युरेटिव्ह याचिका दाखल करण्यात आली आहे. 3 निवृत्त न्यायमूर्तींची समिती गठित करण्यात आली असं शिंदे यांनी म्हटलं आहे.

सरकारला थोडा वेळ द्यावा : "मराठा समाजानं थोडा संयम ठेवावा. सरकारला थोडा वेळ द्यावा. मनोज जरांगे यांनी उपोषण मागं घ्यावं. संपूर्ण मराठा समाजानं सहकार्य करावं, असं मुख्यमंत्री एकनाथ शिंदे म्हणाले. राज्यात कायदा सुव्यवस्था, शांतता राखण्यासाठी सर्व पक्षांनी प्रयत्न करणं आवश्यक आहे. त्यासाठी आजच्या बैठकीत सर्वपक्षीय ठराव करण्यात आल्याची माहितीही मुख्यमंत्र्यांनी दिली.

हेही वाचा -

  1. Maratha Reservation All Party Meeting: आंदोलनाला हिंसक वळण लागल्यानं सर्वपक्षीय बैठकीत नाराजी, एकमतानं 'हा' केला ठराव
  2. MLAs Agitation at Mantralaya : मराठा आरक्षणासाठी मंत्रालयाच्या गेटला ठोकलं टाळं, आमदारांना नेलं पोलीस स्थानकात!
  3. All Party Meeting on Maratha Reservation : सर्वपक्षीय बैठकीच्या निमंत्रणावरुन ठाकरे गटाचं आधी 'मानापमान' नंतर 'तळ्यात, मळ्यात', 'शेवटी सूर राहू दे'

Last Updated : Nov 1, 2023, 4:54 PM IST
ETV Bharat Logo

Copyright © 2024 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.