जालना - महाराष्ट्राचे नवे मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी मुख्यमंत्री पदाची शपथ घेतली. त्यानंतर भोकरदनमध्ये महाविकास आघाडीच्या कार्यकर्त्यांनी फटाके फोडत जल्लोष साजरा केला. गेल्या कित्येक दिवसांपासून राजकीय वर्तुळातून वेगवेगळया घडामोडी जनतेला पहायला मिळाल्या होत्या.
हेही वाचा - पहिल्या मंत्रिमंडळ बैठकीत लपून-छपून बहुमत सिद्ध करण्यावर चर्चा - फडणवीस
राज्यपाल व प्रमुख मान्यवरांच्या उपस्थितीमध्ये महाराष्ट्राचे नवे मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी मुख्यमंत्री पदाची शपथ घेतली. त्यामुळे महाविकास आघाडीच्या कार्यकर्त्यांनी भोकरदन शहरातील छत्रपती शिवाजी महाराज व डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या पुतळ्यांजवळ फटक्यांची आतषबाजी करून कार्यकर्त्यांनी एकमेकांना पेडे भरवत आनंदोत्सव साजरा केला.
दरम्यान, मुख्यमंत्री शपथ सोहळा पाहण्यासाठी नागरिकांनी टीव्हीसमोर मोठी गर्दी केल्याचे ठिकठिकाणी दिसून आले. यावेळी काँग्रेसचे जालना जिल्हाध्यक्ष राजाभाऊ देशमुख, राष्ट्रवादी काँग्रेसचे गटनेते नगरसेवक नसीम पठान, उपनगराध्यक्ष इरफान सिद्दीकी, महेश औटी, श्रावणकुमार अक्से, दिपक जाधव, शेख नईम, शेख रइस, ईश्वर इंगळे, रावसाहेब पाटील यांच्यासह महाविकास आघाडीच्या कार्यकर्त्यांची मोठी उपस्थिती होती.