जालना - कोरोनाच्या पार्श्वभूमीवर महाराष्ट्र फर्टीलायझर पेस्टिसाईड्स डीलर्स असोसिएशन, पुणे(माफदा) यांच्यावतीने मुख्यमंत्री सहाय्यता निधीसाठी जमा झालेली 25 लाख रुपयांची रक्कम एका धनादेशाद्वारे कृषिमंत्री दादाजी भुसे यांच्याकडे सुपूर्द करण्यात आली.
खरीप हंगाम आढावा 2020च्या विभागीय बैठकीसाठी कृषिमंत्री भुसे हे गुरुवारी जालन्यात आले होते. यावेळी या संघटनेचे अध्यक्ष जगन्नाथ काळे, सचिव प्रकाश मुथा, जालना जिल्हा अध्यक्ष अतुल लढ्ढा, संचालक नाना उकिरडे यांनी या रकमेचा धनादेश सुपूर्द केला. त्यांनी यापूर्वीदेखील 28 लाख रुपये पंतप्रधान सहाय्यता निधीसाठी दिले असल्याचेही अतुल लढ्ढा यांनी सांगितले.
मुख्यमंत्री सहायता निधीसाठी "माफदा"ने दिली 25 लाखांची मदत
महाराष्ट्र फर्टीलायझर पेस्टिसाईड्स डीलर्स असोसिएशन, पुणे यांनी मुख्यमंत्री सहाय्यता निधीसाठी २५ लाख रुपये दिले.