ETV Bharat / state

जालन्यात रिक्षा चालकांना गॅस मिळेना, जिल्हाधिकाऱ्यांना निवेदन - रिलायन्स पेट्रोल पंप

जालना येथील एलपीजी गॅस पंपावर गॅसचा तुटवडा निर्माण झाल्याने रिक्षा चालकांनी जिल्हाधिकाऱ्यांना निवेदन दिले आहे.

जालन्यात रिक्षा चालकांना गॅस मिळेना
author img

By

Published : Aug 24, 2019, 12:10 PM IST

जालना - औरंगाबाद पाठोपाठ आता जालन्यात एलपीजी गॅसवर चालणाऱ्या ऑटो रिक्षांची संख्या वाढली आहे. वाढत्या संख्येसोबतच एलपीजी गॅस पुरवणाऱ्या पेट्रोल पंपातही वाढ झाली आहे. मात्र, जालना-औरंगाबाद मार्गावर असलेला रिलायन्स पेट्रोल पंप असून अडचण नसून खोळंबा, अशी परिस्थिती झाली आहे. या पंपावर गॅस मिळत नसल्यामुळे रिक्षा चालकांना मनस्ताप सहन करावा लागत आहे.

जालन्यात रिक्षा चालकांना गॅस मिळेना

या पंपावर जाण्या-येण्यातच रिक्षाचालकांचा वेळ आणि पैसा वाया जात आहे. त्यासोबत येथे फक्त रोखीने व्यवहार केले जातात. त्यामुळे बाहेरगावाहून आलेल्या एलपीजी वाहनधारकांकडे रोख रक्कम नसल्यामुळे कुचंबणा होत आहे.

जालना शहरात किरण ऑइल कंपनी येथे एलपीजी गॅसचा पुरवठा केला जातो. मात्र, शहराला फक्त या पंपावरील गॅस पुरवठा पुरेसा होत नाही. त्यामुळे शहरात गॅसची टंचाई जाणवत आहे.

या दोन्ही पेट्रोल पंपामुळे एलपीजी वाहनधारकांना होत असलेला मानसिक त्रास आणि आर्थिक भुर्दंड याला पायबंद घालण्यासाठी रिक्षाचालकांनी जिल्हाधिकार्‍यांना निवेदन देऊन गॅसचा पुरवठा मुबलक प्रमाणात आणि वेळेत करावा, अशी मागणी केली आहे. ज्या वाहनांना एलपीजी गॅसची सवय झाली आहे. ती वाहने पेट्रोलवर चालवण्यासाठी परवडत नाहीत आणि पर्यायाने आर्थिक भुर्दंडही सहन करावा लागत आहे. या दोन्ही कचाट्यात सापडलेल्या रिक्षाचालकांनी जिल्हाधिकाऱ्यांना निवेदन दिले.

यावेळी नगरसेवक जयंत भोसले, ज्ञानेश्वर ढोबळे यांच्यासह रिक्षाचालक बाबासाहेब राऊत, वैभव पत्की, शरद राजाळे, रोहन चांदवडे, संजय पाठक, लक्ष्मण चव्हाण आदींची उपस्थिती होती.

Intro:औरंगाबाद पाठोपाठ जालन्यात आता एलपीजी गॅसवर चालणाऱ्या ऑटो रिक्षांची संख्या वाढली आहे. वाढत्या संख्ये सोबतच एलपीजी गॅस पुरवणाऱ्या पेट्रोल पंपात ही वाढ झाली आहे ,मात्र जालना औरंगाबाद रोडवर असलेला रिलायन्स पेट्रोल पंप म्हणजे असून अडचण नसून खोळंबा अशी परिस्थिती झाली आहे ,या पंपावर सुविधा मिळण्यापेक्षा ग्राहकाला मनस्तापच जास्त करावा लागत आहे .शहरापासून आठ किलोमीटर बाहेर असलेल्या पंपावर गॅस मिळेलच याचा भरोसा नाही .त्यामुळे जाणे येण्यातच रिक्षाचालकांचा वेळ आणि पैसा वाया जात आहे. त्यासोबत येथे फक्त रोखीने व्यवहार केले जात आहे, त्यामुळे बाहेरगावाहून आलेल्या एलपीजी वाहनधारकांची रोख रक्कम नसल्यामुळे आणि कार्ड ची सुविधा पँपावर नसल्यामुळे कुचंबणा होत आहे .
जालना शहरात किरण ऑइल कंपनी वर एलपीजी गॅस चा पुरवठा केला जातो मात्र शहराला खेटूनच असलेल्या या पंपावरील पुरवठा रिक्षाचालकांना पुरेसा होत नाही. त्यामुळे तिथे देखील गॅसची टंचाई भासण्याची प्रमाण वाढले आहे.

Body:या दोन्ही पेट्रोल पंपा मुळे एलपीजी वाहनधारकांना होत असलेला मानसिक त्रास आणि आर्थिक भुर्दंड याला पायबंद घालण्यासाठी रिक्षाचालकांनी िल्हाधिकार्‍यांना निवेदन देऊन गॅसचा पुरवठा मुबलक प्रमाणात आणि वेळेत करावा अशी मागणी केली आहे. ज्या वाहनांना एलपीजी गॅस ची सवय झालेली आहे ती वाहने पेट्रोलवर चालविण्यासाठी परवडत नाहीत, आणि पर्यायाने आर्थिक भुर्दंडही सहन करावा लागत आहे .या अशा दोन्ही कचाट्यात सापडलेल्या रिक्षाचालकांनी हे निवेदन दिले आहे. यावेळी नगरसेवक जयंत भोसले, ज्ञानेश्वर ढोबळे, यांच्यासह रिक्षाचालक बाबासाहेब राऊत ,वैभव पत्की ,शरद राजाळे ,रोहन चांदवडे, संजय पाठक ,लक्ष्मण चव्हाण ,आदींची उपस्थिती होती.

Conclusion:
ETV Bharat Logo

Copyright © 2024 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.