जालना - भोकरदन तालुक्यात अवैध दारू विक्री करणाऱ्यांवर कारवाई करून दारुसाठा जप्त करण्यात आला आहे. मिळालेली माहिती अशी की, भोकरदन तालुक्यात अवैध दारू विक्री करत असल्याची माहिती खबऱ्यामार्फत पोलिसांना मिळाली. त्याआधारे पोलिसांनी पथक तयार करून सापळा रचून दारूच्या अड्ड्यावर छापा टाकला.
अवैध दारू बनवणारे आविनाश एकनाथ ठोंबरे, समाधान सुधाकर लोखंडे यांच्या ताब्यातून विदेशी आणि देशी दारूचा 9 हजार 663 रुपयांचा दारूसाठा जप्त करण्यात आला. तसेच, आव्हाना गावातील देशी दारूच्या दुकानातून 420 रुपये, असा एकूण 10 हजार 083 रुपयांचा देशी व विदेशी दारूचा साठा जप्त केला. या सर्वांविरोधात पोलीस ठाणे भोकरदन येथे गुन्हे दाखल करण्यात आले आहेत.
ही कारवाई पोलीस अधिक्षक चैतन्य साहेब, अप्पर पोलीस अधिक्षक समाधान पवार, उपविभागीय पोलीस अधिकारी भोकरदन सुनिल जायभाये, पोलीस निरीक्षक दशरथ चौधरी यांच्या मार्गदर्शनाखाली सपोनि वडदे, पोहेकॉ मिलींद सुरडकर, पोको. संजय क्षीरसागर, अभिजीत बायकोस, गणेश निकम, जगन्नाथ जाधव आणि समाधान जगताप यांनी केली आहे..