जालना -एका वृत्तवाहिनीने आुपल्या बातमीपत्रात मोहम्मद पैगंबर यांचे छायाचित्र लावले होते. मात्र, प्रत्यक्षात त्यांचे छायाचित्र उपलब्ध नाही. छायाचित्र उपलब्ध नसतानाही पैगंबर यांचे काल्पनिक रेखाचित्राचा वापर करणे निंदनीय असल्याचा आरोप रजा अकादमीचे पदाधिकारी सय्यद नुरी यांनी केला आहे. तसेच या प्रकरणी संबंधित वृत्तसंस्थेविरुद्ध न्यायलयीन लढा देणार असल्याचेही त्यांनी सांगितले.
रेखाचित्राला विरोध
प्रेषित मोहम्मद पैगंबर यांचे छायाचित्र कुठेही नाही. परंतु काल्पनिक रेखाचित्र रेखाटून त्याचा उपयोग एका वृत्तसंस्थेने बातमीमध्ये केला होता. या प्रकाराला सुफी पंथाकडून काडाडून विरोध झाला. त्यानंतर संबंधित वृत्तवाहिनीने माफीही मागितली मात्र, त्या वृत्तवाहिनीविरोधात न्यायलयीन लढा देणार आहे. यासाठी वकिलांची एक टीम तयार करणार येणार असल्याचे नुरी यांनी सांगितले.
कायदेशीर लढाई लढणार
प्रसिद्ध केलेल्या रेखाचित्रा संदर्भातील बातमीदेखील या वृत्तवाहिनीने काढून घेतली आणि सुफी धर्मीयांची माफीही मागितली आहे. त्यांनी माफी मागितल्यामुळे आमचा त्यांच्याविरोधात काही रोष नाही, मात्र त्यांना माफ करण्याचा अधिकार हा न्यायालयाला आहे. आणि त्यांना जर न्यायालयाने माफ केले तर आमची कुठलीही हरकत नाही, असेही सय्यद नुरी म्हणाले. यावेळी मौलाना जाहीर अब्बास रजवी, मौलाना जफरउद्दीन रजवी ,हजरत सय्यद अहमद, शेर सवार दर्गाचे प्रमुख सय्यद जमील रजवी, रजा अकादमीचे सय्यदआली अंजुम रजवी, मेमन असिफ रजवी यांची उपस्थिती होती.