ETV Bharat / state

आपच्या कार्यकर्त्यांनी गाठले एस.पी.ऑफीस, कारभारी अंभोरेपुढे प्रशासन हतबल - सुधीर खिरडकर

जालना तालुक्यातील पुणेगाव येथे गायरान जमिनीवर केलेल्या अतिक्रमण प्रकरणी कारभारी अंभोरे यांचे गेल्या 17 दिवसांपासून उपोषण सुरू आहे. या उपोषणाचा तिढा सोडविण्यासाठी दुपारी उपविभागीय पोलीस अधिकारी सुधीर खिरडकर आणि आम आदमी पार्टीचे कार्यकर्ते संजय देठे यांच्यात वाद झाल्यानंतर हे प्रकरण अधिकच चिघळले.

कारभारी अंभोरे
author img

By

Published : Aug 20, 2019, 11:49 PM IST

जालना - जालना तालुक्यातील पुणेगाव येथे गायरान जमिनीवर केलेल्या अतिक्रमण प्रकरणी कारभारी अंभोरे यांचे गेल्या 17 दिवसांपासून उपोषण सुरू आहे. या उपोषणाचा तिढा सोडविण्यासाठी दुपारी उपविभागीय पोलीस अधिकारी सुधीर खिरडकर आणि आम आदमी पार्टीचे कार्यकर्ते संजय देठे यांच्यात वाद झाल्यानंतर हे प्रकरण अधिकच चिघळले.

कारभारी अंभोरेपुढे प्रशासन हतबल

सदर प्रकरणी देठे यांच्या समर्थनार्थ आपच्या कार्यकर्त्यांनीही उपोषणाच्या ठिकाणी ठिय्या दिला. त्यानंतर त्यांनी पोलीस अधीक्षक कार्यालय गाठले. मात्र, पोलिसांनी प्रवेशद्वारावरच त्यांना अडविले. त्यावेळी पोलीस अधीक्षकांसोबत भ्रमणध्वनीवर बोलणे झाल्यानुसार या कार्यकर्त्यांना सभागृहात बसण्यास सांगून 2 कार्यकर्त्यांना अधीक्षकांनी चर्चेसाठी बोलाविले. मात्र, यावेळी १० कार्यकर्त्‍यांना भेटू द्यावे अशी भूमिका कार्यकर्त्‍यांनी घेतली. त्यामुळे संतप्त झालेल्या पोलीस अधीक्षकांनी सुमारे 50 कार्यकर्त्यांना कार्यालयाच्या बाहेर काढून दिले, आणि 2 कार्यकर्त्यांसोबतच चर्चा केली. या चर्चेनंतर हे कार्यकर्ते परत उपोषणस्थळी येऊन मार्गस्थ झाले.

दरम्यान महसूल प्रशासनाने पोलीस प्रशासनाला अतिक्रमण काढण्यासाठी पोलीस बंदोबस्ताची मागणी केली. यात 21 ऑगस्ट रोजी हे अतिक्रमण काढण्याचे ठरले. सदर प्रस्ताव घेऊन पोलीस अधिकारी उपोषणकर्ते कारभारी अंभोरे यांच्याकडे गेले. मात्र, अंभोरे यांनी पुन्हा एकदा ताठर भूमिका घेत 'एवढे दिवस उपोषण केले तसे आणखी एक दिवस उपोषण करतो' असे म्हणत उपोषण सोडण्यास नकार दिला. आणि उद्या अतिक्रमण हटवल्यानंतरच आपण उपोषण सोडू असे सांगितले. त्यामुळे पोलीस प्रशासन देखील हतबल झाले. तर, पुणेगाव येथील काही ग्रामस्थांनी उपोषण कर्त्याजवळच रात्र काढण्याचा विचार व्यक्त केला.

दरम्यान या सर्व प्रकारावर आपण लक्ष ठेवून आहोत. आणि कुठलाही अनुचित प्रकार घडणार नाही याची काळजी घेऊ अशी माहिती पोलीस अधीक्षक चैतन्य यांनी ईटीव्ही शी बोलताना दिली.

Intro:जालना तालुक्यातील पुणेगाव येथे गायरान जमिनीवर केलेल्या अतिक्रमण प्रकरणी कारभारी अंभोरे यांनी गेल्या 17 दिवसांपासून उपोषण सुरू केले आहे. या उपोषणाचा तिढा सोडविण्यासाठी दुपारी उपविभागीय पोलीसअधिकारी सुधीर खिरडकर आणि आम आदमी पार्टीचे कार्यकर्ते संजय देठे यांच्यात वाद झाल्यानंतर हे प्रकरण अधिकच चिघळले. देठे यांच्या समर्थनार्थ आपच्या कार्यकर्त्यांनीही उपोषणाच्या ठिकाणी ठिय्या दिला .त्यानंतर त्यांनी पोलीस अधीक्षक कार्यालय गाठले. मात्र पोलिसांनी प्रवेशद्वारावरच त्यांना अडविले. त्यावेळी पोलीस अधीक्षकां सोबत भ्रमणध्वनीवर बोलणे झाल्यानुसार या कार्यकर्त्यांना सभागृहात बसण्यास सांगितले .आणि दोन कार्यकर्त्यांना अधीक्षकांनी चर्चेसाठी बोलाविले, मात्र कार्यकर्त्यांनी दहा कार्यकर्त्‍यांना भेटू द्यावे अशी भूमिका घेतल्यामुळे संतप्त झालेल्या पोलिस अधीक्षकांनी सुमारे पन्नास कार्यकर्त्यांना कार्यालयाचे बाहेर काढून दिले. आणि दोन कार्यकर्त्यां सोबतच चर्चा केली. या चर्चेनंतर हे कार्यकर्ते परत उपोषणस्थळी येऊन मार्गस्थ झाले.
याच वेळी महसूल प्रशासनाने पोलीस प्रशासनाला अतिक्रमण काढण्यासाठी पोलिस बंदोबस्ताची मागणी केली .आणि उद्या दिनांक 21 रोजी हे अतिक्रमण काढण्याचे ठरले .हा प्रस्ताव घेऊन पोलीस अधिकारी उपोषण करते कारभारी अंभोरे यांच्याकडे गेले ,मात्र अंभोरे यांनी पुन्हा एकदा ताठर भूमिका घेत 'एवढे दिवस उपोषण केले तसे आणखी एक दिवस उपोषण करतो' असे म्हणत उपोषण सोडण्यास नकार दिला. आणि उद्या अतिक्रमण हटवून आल्यानंतरच आपण उपोषण सोडू असे सांगितले .त्यामुळे पोलीस प्रशासन देखील हतबल झाले.
दरम्यान या सर्व प्रकारावर आपण लक्ष ठेवून आहोत. आणि कुठलाही अनुचित प्रकार घडणार नाही याची काळजी घेऊ अशी माहिती पोलीस अधीक्षक चैतन्य यांनी ईटीव्ही शी बोलताना दिली.

Body:दरम्यान पुणे गाव येथील काही ग्रामस्थांनी उपोषण कर्त्या जवळच रात्र काढण्याचा विचार व्यक्त केला

Conclusion:
ETV Bharat Logo

Copyright © 2024 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.