जालना - कोहिनूर मिल प्रकरणी मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांना अंमलबजावणी संचालनालयाने (ईडी) नोटीस बजावली होती. त्यानुसार त्यांना आज(गुरुवारी) चौकशीसाठी ईडीच्या कार्यालयात हजर राहण्यास सांगितले होते. या नोटीसनंतर राज यांनी आपल्या कार्यकर्त्यांना कायदा आणि सुव्यवस्था राखत शांत राहण्याचे आवाहन केले होते. मात्र, या आवाहनानंतरही मनसैनिकांनी गुरुवारी येथील जिल्हा भाजप कार्यालयासमोर ठिय्या आंदोलन केले.
आंदोलनामध्ये या कार्यकर्त्यांनी अंगात काळे कपडे घालून भाजप सरकारचा निषेध केला. तर आंदोलन सुरू होताच सदर बाजार पोलिसांनी मनसेच्या चार आंदोलकांना ताब्यात घेतले आहे. मनसे उपाध्यक्ष मिन्नी शाईवाले, राहुल रत्नपारखे, आकाश जाधव, अजय मोरे असे अटक करण्यात आलेल्या कार्यकर्त्यांची नावे आहेत.