ETV Bharat / state

'ईटीव्ही भारत' स्पेशल: 'असे' केले जाते शासकीय कार्यालयातील संचिकांचे वर्गीकरण - जालना जिल्हा लेटेस्ट न्यूज

शासकीय कार्यालयांमध्ये वेगवेगळ्या रंगांच्या कपड्यांमध्ये वर्षानुवर्ष बांधून ठेवलेले संचिकांची गठ्ठे पाहायला मिळतात. सामान्य व्यक्तीला जरी या रंगाशी काही देणेघेणे नसले, तरी शासन दरबारी मात्र या रंगाच्या वर्गवारीला अत्यंत महत्त्व आहे. वर्गवारीनुसारच या संचिका किती वर्ष सांभाळून ठेवायच्या? हे ठरवले जाते.

'असे' केले जाते शासकीय कार्यालयातील संचिकांचे वर्गीकरण

author img

By

Published : Feb 5, 2021, 6:42 PM IST

जालना - शासकीय कार्यालयांमध्ये वेगवेगळ्या रंगांच्या कपड्यांमध्ये वर्षानुवर्ष बांधून ठेवलेले संचिकांची गठ्ठे पाहायला मिळतात. सामान्य व्यक्तीला जरी या रंगाशी काही देणेघेणे नसले, तरी शासन दरबारी मात्र या रंगाच्या वर्गवारीला अत्यंत महत्त्व आहे. वर्गवारीनुसारच या संचिका किती वर्ष सांभाळून ठेवायच्या? हे ठरवले जाते.

असे असते कपड्यांचे वर्गीकरण

ज्या रंगाच्या कपड्यात या संचिका बांधल्या आहेत त्या संचिका किती वर्षांपर्यंत सांभाळून ठेवायच्या याची मुदत हे कपडे सांगतात. त्यानुसार त्याचे वर्गीकरण करण्यात येते.

अ) लाल कपड्यांमध्ये बांधलेल्या संचिका कायमस्वरूपी जतन करून ठेवाव्या लागतात.

ब) हिरव्या कपड्यांमध्ये बांधलेल्या संचिका या 30 वर्षांपर्यंत जतन केल्या जातात.

क )पिवळ्या रंगाच्या कपड्यांमध्ये बांधलेल्या संचिका दहा वर्षांपर्यंत
क -1) पांढऱ्या रंगात बांधलेल्या संचिका पाच वर्षांपर्यंत

ड)काळ्या कपड्यांमध्ये बांधलेल्या संचिका एका वर्षापर्यंत जपून ठेवाव्या लागतात

त्यामुळे या रंगाला देखील शासन दरबारी खूप महत्त्व आहे. त्याच सोबत एका गठ्ठ्यामध्ये 15 इंच पर्यंत या संचिका असाव्यात असाही दंडक आहे. त्यानुसार एका गठ्ठ्यामध्ये 10 ते 15 संचिका बसतील अशी व्यवस्था करण्यात येते. आणि या गठ्ठ्यात सुरुवातीच्या मुखपृष्ठावर संचिकेचे वर्गीकरण करून शेवटच्या पानावर स्वाक्षरी देखील केली जाते.

'असे' केले जाते शासकीय कार्यालयातील संचिकांचे वर्गीकरण

कर्मचाऱ्यांचा एक-तृतीयांश कालावधी जातो कार्यालयात

जिल्ह्यामध्ये एकूण कार्यरत असणाऱ्या कर्मचाऱ्यांपैकी 70 टक्के कर्मचारी पंचायत राज व्यवस्थेमध्ये कार्यरत आहेत .आणि त्यामध्ये जिल्हा परिषद ही एक महत्त्वाची व्यवस्था आहे. प्रत्येक अधिकारी कर्मचाऱ्यांचा दिवसभरात एक तृतीयांश कालावधी हा कार्यालयात जातो. त्यामुळे तेथील वातावरण स्वच्छ, सुंदर असेल तर कर्मचार्‍याच्या कार्यक्षमतेमध्ये वाढ होते, ही वाढ करून कामामध्ये त्याचा उपयोग करुन घेण्यासाठी सुंदर माझे कार्यालय हा उपक्रम 28 डिसेंबर ते 28 फेब्रुवारी या कालावधीमध्ये राबविण्यात आला आहे. या उपक्रमांतर्गत जालना जिल्हा परिषदेतील प्राथमिक शिक्षण विभागाने हे कार्यालय स्वच्छ केले आहे.

सर्वात मोठा शिक्षण विभाग

प्रशासकीय यंत्रणेत कामाच्या सुसूत्रतेसाठी प्रत्येक कार्यालयात वेगवेगळे विभाग आहेत. परंतु या यंत्रणेमधील जिल्हा परिषदेचा शिक्षण विभाग हा सर्वच कार्यालयांच्या तुलनेत मोठा आहे. ग्रामीण भागातील जिल्हा परिषदेच्या शाळेच्या शिपायापासून ते शिक्षणाधिकाऱ्यांपर्यंत हजारो कर्मचारी या विभागांतर्गत काम करतात. त्यासोबत खासगी संस्थांच्या परवानग्या, त्यांच्या संचिका, कर्मचाऱ्यांची आर्थिक देवाण-घेवाण, बदल्या, अशा प्रत्येक कामासाठी अनेक कागद पत्रे जोडावी लागतात. त्यामुळे या कार्यालयातील संचिकाचा गठ्ठा रोजच वाढत जातो.आणि म्हणूनच या कार्यालयात इतर कार्यालयांच्या तुलनेत संचिका भरमसाठ होतात.

टाईपराईटरची जागा घेतली संगणकाने

तीस वर्षांपूर्वी शासकीय कार्यालयांमध्ये टाईप रायटरचा खडखड आवाज घुमायचा मात्र ती जागा आता संगणकाने घेतल्यामुळे हे टाईपराईटर भंगारात निघाले आहेत. त्यासोबत आडव्या उभ्या ओळी असलेले त्यावेळेचे रजिस्टर ही आता कालबाह्य झाले आहेत. 1991 चे कार्यालयीन कागदपत्रे आणि रजिस्टर जिल्हा परिषद शिक्षण विभागात पहायला मिळत आहेत. त्यावेळी सर्व कामे हातानेच करावी लागत होती आणि याच्या नोंदी देखील हस्ताक्षर, रजिस्टरवर आजही पाहायला मिळतात. शिक्षण संचालक पुणे यांच्याकडे पाठवलेले कागदपत्रे जिल्हा परिषदेने आजही जपून ठेवली आहेत.

ETV Bharat Logo

Copyright © 2024 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.