जालना - तरुणांना नोकरीचे आमिष दाखवून त्यांची मूळ कागदपत्रे जमा करणाऱ्या तरुणाचे गुरुवारी अपहरण झाले. मात्र, हाच तरुण नोकरी तर सोडाच त्यांची मूळ कागदपत्रे परत करण्यासाठी पुन्हा प्रत्येकी अकरा हजार रुपये मागत असल्याचे पुढे आल्याने अपहरण झालेला तरुणच आरोपी होण्याची शक्यता आहे. दरम्यान अपहरणकर्ते आणि अपहरण झालेला तरुण अशा दहा जणांना सदर बाजार पोलिसांनी सातारा येथून ताब्यात घेतले आहे.
गुंतागुंतीचे प्रकरण -
14 तारखेला सकाळी साडेअकरा वाजता जालना बस स्थानकातून एका तरुणाचे अपहरण झाल्याची माहिती सदर बाजार पोलिस ठाण्याचे पोलिस निरीक्षक संजय देशमुख यांना मिळाली. त्यानुसार त्यांनी तात्काळ घटनास्थळी धाव घेऊन माहिती घेतली असता तेथील प्रवाशांनी फक्त गाडीचे वर्णन सांगितले. मात्र, अपहरण झालेला तरुण कोण? आणि अपहरण करते कोण? याचा सुगावा लागेना बराच वेळानंतर सीसीटीव्ही फुटेज तपासल्यानंतर पवन गुसिंगे नावाचा तरुण समोर आला आणि त्याने सांगितले की त्याचा मित्र विठ्ठल विजय सिंग जारवाल राहणार राजेवाडी याचे अपहरण झाले आहे.
बस स्थानकात कोणाचेतरी कागदपत्र द्यायचे आहेत असे म्हणत आम्ही दोघे येथे आलो होतो. असे सांगत असताना एका पांढर्या रंगाची (एम एच 04 -FR -0356 क्रमांकाची) टाटा सुमो तिथे उभी होती. या वाहनातील तरुणांनी विठ्ठल जारवाल याला कागदपत्रं विषयी विचारणा केली आणि त्यानंतर त्याला मारहाण करून गाडीत ओढून बसवले. ही गाडी नंतर निघून गेली. या माहितीवरून पोलिसांनी सर्वत्र सतर्कतेचा इशारा दिला. वाहनांची तपासणी करण्यासाठी नाकाबंदी करण्यास सांगितले. दरम्यान ठिकाणाच्या तपासणीवरून हे वाहन अंबड, पैठण, शेवगाव मार्गे पुढे जात असल्याची माहिती संजय देशमुख यांना मिळाल्यावरून त्यांनी अहमदनगर, सातारा, कोल्हापूर, येथील नियंत्रण कक्षाशी संपर्क साधून या गाडीचा शोध घेण्यास सांगितले.
सातारा पोलिसांची नाकेबंदी -
सातारा येथील स्थानिक गुन्हे शाखेचे पोलीस निरीक्षक किशोर धुमाळ, सहाय्यक पोलीस निरीक्षक गरजे, यांनी साताऱ्यात प्रवेश करणाऱ्या सर्व रस्त्यांवर नाकाबंदी केली. आणि या नाकाबंदी मध्ये या वाहना मधील सर्व युवकांची सुटका केली.
जारवाल याने साताऱ्याच्या तरुणांची केली फसवणूक -
अपहरण झालेला तरुण विठ्ठल जारवाल याची बहिण सातारा येथे राहते. तिच्याकडे गेल्यानंतर विठ्ठल ने तेथील वैभव भास्कर शेषवारे या बेरोजगार तरुणाला नोकरी लावून देण्याचे आमिष दाखवले.दिल्लीला असलेले मंत्री माझे नातेवाईक आहेत त्यांना सांगून सरकारी नोकरी लावतो असे सांगितले, तसेच आम्ही डमी उमेदवार बसवून परीक्षा पास करून घेतो असेही सांगितले. त्यामुळे काही तरुणांनी विठ्ठल जारवाल कडे त्यांची शैक्षणिक पात्रता असलेली मूळ कागदपत्रे दिली. मात्र गेल्या सहा महिन्यांपासूनपुढे काहीच झाले नाही. त्यामुळे हे तरुण वारंवार कागदपत्रांची मागणी करत होते. आणि दोन वेळा जालन्याला येऊनही गेले. मात्र, विठ्ठल जारवाल त्यांना भेटला नाही. उलट कागदपत्रे हवी असतील तर मला दिल्लीला जावे लागेल आणि विमानाचा खर्च प्रत्येकी अकरा हजार रुपये द्या अशी मागणी तो करू लागला. त्यामुळे वैतागलेल्या तरुणांनी जालना बस स्थानकात भर वस्तीमध्ये विठ्ठल जारवाल ला बोलावले आणि त्याचे अपहरण करून साताऱ्याला नेले.
विठ्ठल जारवाल कडे मूळ कागदपत्रांचा गठ्ठा -
ज्या युवकाचे अपहरण झालेले आहे तो युवक विठ्ठल जारवाल याच्याकडे सुमारे पंचवीस ते तीस जणांच्या मूळ कागदपत्रांचा गठ्ठा सापडला आहे .त्यामुळे अशा आणखी किती जणांची फसवणूक झाली आहे हे पोलीस तपासात पुढे येणारच आहे
हे आहेत अपहरण करते -
पोलिसांनी ज्या नऊ जणांना अपहरणप्रकरणी ताब्यात घेतले आहेत त्यांची सुरक्षा रक्षक पुरविण्याची " मराठा कमांडो" या नावाने एक संस्था आहे. या संस्थेचे चे अध्यक्ष आणि पदाधिकाऱ्यांनी हे अपहरण केले आहे.
1 वैभव भैरू पाटील (21, तिरपण्या, पन्हाळा, कोल्हापूर)
2 सतीश विठ्ठल दराडे (2३, आमनेवाडी, पन्हाळा, कोल्हापूर)
3 प्रशांत संभाजी पवार ( 29, करंजोशी, शाहूवाडी, कोल्हापूर)
4 पुष्पराज मारुती जाधव( 26, युलूर, वाळवा, सांगली)
5 वैभव भास्कर शेषवारे (35, राहणार अग्रणधुळगाव, कवठेमहाकाळ,सांगली)
6 मनोहर भास्कर शेषवारे (42,अग्रणधुळगाव,सांगली)
7 नितीन बाळू दाढे (23, वाफळे, मोहोळ, सोलापूर)
8 शरद बाळू दाढे (25, वाफळे, मोहोळ, सोलापूर)
याच्यासह अपहरण झालेल्या विठ्ठल ला देखील पोलिसांनी ताब्यात घेतले आहे .पोलिस निरीक्षक संजय देशमुख यांच्या टीम मधील कैलास खाडे, समाधान तेलंग्रे, फुलचंद गव्हाणे, सुधीर वाघमारे, योगेश पठाडे यांनी या कारवाईत भाग घेतला.