ETV Bharat / state

खोतकरांनी ९० कोटीचा भुखंड हडपला; संजय लाखेंचा आरोप

मे. दर्शना इंडस्ट्रीजमध्ये खोतकर परिवारातील अर्जुन खोतकर यांची पत्नी आणि त्यांच्या वडीलांचे नाव होते. या परिवारातील सदस्यांना कोणताही त्रास होऊ नये, यासाठी मी कोणाविरोधात गुन्हा दाखल न करता हे प्रकरण न्यायालयात लढवत आहे, असे लाखेंनी यावेळी स्पष्ट केले.

डॉक्टर संजय लाखे पाटील
author img

By

Published : Mar 18, 2019, 7:30 PM IST

जालना - शिवसेनेचे विद्यमान राज्यमंत्री अर्जुन खोतकर यांनी माझ्या नावाचा गैरवापर घेत खोटी कागदपत्रे बनवून ९० कोटींचा भुखंड हडप केल्याचा आरोप डॉक्टर संजय लाखे पाटील यांनी केला आहे. लाखे यांनी आज पत्रकार परिषद घेऊन ही माहिती दिली.

डॉक्टर संजय लाखे पाटील

२६ जून २००२ मध्ये दर्शना इंडस्ट्रीजच्या नावाने अर्ज करून जालना औद्योगिक वसाहतीमध्ये P२ हा भुखंड खोतकर यांनी मागून घेतला. भुखंड वाटपाच्या कमिटीने 2003 मध्ये हा भुखंड नरेंद्र लाखे यांच्या नावाने असल्याने तो देता येणार नसल्याचे सांगितले. यामुळे खोतकरांनी संजय निळकंठ लाखे हे अर्जदार नसतानाही त्यांच्या नावाने बनावट ना हरकत प्रमाणपत्र तयार करून एमआयडीसी अधिकाऱ्यांना दिले आणि आपली राजकीय ताकद वापरून हा भुखंड दर्शना इंडस्ट्रीजला वाटप झाल्याचे जाहीर केले. मात्र, २००४ मध्ये माहितीच्या अधिकारानुसार सर्व कागदपत्र बाहेर आल्यानंतर हे प्रकरण उघडकीस आले. तेव्हापासून आपण याविषयी न्यायालयात दाद मागत असल्याचे लाखेंनी सांगितले.

मे. दर्शना इंडस्ट्रीजमध्ये खोतकर परिवारातील अर्जुन खोतकर यांची पत्नी आणि त्यांच्या वडीलांचे नाव होते. या परिवारातील सदस्यांना कोणताही त्रास होऊ नये, यासाठी मी कोणाविरोधात गुन्हा दाखल न करता हे प्रकरण न्यायालयात लढवत आहे, असे लाखेंनी यावेळी स्पष्ट केले. मात्र, सध्या अर्जुन खोतकर हे माझी बदनामी करत धमक्या देत असल्याचा आरोप करत असल्याचे ते म्हणाले.

Intro:शिवसेनेचे विद्यमान मंत्री अर्जुन खोतकर यांनी माझ्या नावाचा गैरवापर करून खोटी कागदपत्रे बनवून 90 कोटी चा प्लॉट हडप केला आहे. आणि उलट आता मीच त्यांना गुन्हा दाखल करण्याच्या धमक्या देत असल्याचे ते सांगत सुटले आहेत. खरे तर हे प्रकरण सध्या न्यायप्रविष्ट आहे आणि आपण गुन्हा दाखल केला नाही. आणि त्यामध्ये खोतकर यांच्या सुविद्य पत्नी आणि त्यांच्या वडिलांची नावे असल्यामुळे आपण त्या थराला जाणार नाहीत, अशी माहिती डॉक्टर संजय लाखे पाटील यांनी दिली.

Body:लाखे पाटील यांनी आज पत्रकार परिषद घेऊन माहिती दिली. की ऑगस्ट 95 मध्ये नियमानुसार अर्ज करून जालना औद्योगिक वसाहतीमध्ये p2 हा प्लॉट(सद्या बंद असलेले औरंगाबादला चौफुलीवरील दर्शना हॉटेल) मागणी केला होता त्यानंतर 2000 मध्ये व्हाईट पेपर वर नरेंद्र निळकंठराव लाखे या नावाने अर्ज करून तो कायम केला. 26 जून 2002मध्ये मे दर्शना इंडस्ट्रीज च्या नावाने अर्ज करून हा प्लॉट खोतकर यांनी मागून घेतला. प्लॉट वाटपाच्या कमिटीने 23 डिसेंबर 2003 रोजी हा प्लॉट नरेंद्र लाखे यांच्या नावाने असल्यामुळे तो देता येणार नसल्याचे सांगितले,तसेच तो लाखे याची ना हरकत प्रमाणपत्र असेल तर देत येईल असे सांगितले. त्यानंतर संजय निळकंठ लाखे हे अर्जदार नसतानाही त्यांच्या नावाने बोगस एनओसी तयार करून एमआयडीसी अधिकाऱ्यांना दिली. आणि आपली राजकीय ताकद वापरून हा प्लॉट दर्शना इंडस्ट्रीज ला वाटप झाल्याचे जाहीर केले .मात्र हे सर्व प्रकार उघडकीस आल्यानंतर 2004 मध्ये माहितीच्या अधिकारात सर्व कागदपत्र मागविल्यानंतर खरेतर हा गुन्हा हा पोलीस ठाण्यामध्ये नोंदवायला हवा होता. मात्र राजकीय पुढाऱ्यांनी आणि माझ्या वरिष्ठांनी मला शांत केले. तसेच मे दर्शना इंडस्ट्रीज मध्ये खोतकर परिवारातील अर्जुन खोतकर यांची पत्नी आणि खोतकरांचे वडील यांची नावे होती. आणि या परिवारातील सदस्यांना कोणताही त्रास होऊ नये , हा आपला हेतू आहे .त्यामुळे मी गुन्हा दाखल न करता न्यायालयात भांडत आहे तो माझा अधिकार आहे .मात्र सध्या परिस्थिती अर्जुन खोतकर हे माझी बदनामी करत सर्वत्र माझ्याकडून त्यांच्या परिवाराला धमक्या दिल्या जात आहेत, आणि त्रास होत आहे. असे सांगत सुटले आहेत प्रत्यक्षात अशा पद्धतीचे काही नसून या प्लॉटच्या भांडणाची सुनावणी दर आठ दिवसाला सुरू आहे.आणि तो निकाल लवकरच लागेल .तसेच लाखे यांनी गुन्हा दाखल करू नये ,यासाठी राजकीय वजन वापरून माझ्यावर दबाव आणत असल्याचा आरोपही लाखे यांनी केला आहे.

Conclusion:
ETV Bharat Logo

Copyright © 2024 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.