जालना - दीडशे वर्षांपूर्वी निजामाने बांधलेल्या इमारतीमध्ये कदीम जालना पोलीस ठाणे सुरू आहे. मात्र, गेल्या वर्षी दोन वेळा या पोलीस ठाण्याचे छत कोसळले. सुदैवाने जीवितहानी झाली नाही. यासंदर्भात ईटीव्ही भारतने वारंवार वृत्त प्रकाशित केले. याची प्रशासनाने गंभीर दखल घेत या वर्षी अपघात होऊ नये म्हणून हे पोलीस ठाणे दुसऱ्या इमारतीत हलविण्याचे निश्चित केले आहे. त्यानुसार पावसाळा सुरू होण्यापूर्वी हे पोलीस ठाणे सर्वे नंबर 488 मधील एका जुन्या भव्य इमारतीमध्ये स्थलांतरित करण्याच्या हालचाली युद्धपातळीवर सुरू आहेत.
ईटीव्ही इम्पॅक्ट : कदीम पोलीस ठाणे सोडणार निजामकालीन इमारतीची साथ - कदीम पोलीस ठाणे
या इमारतीचे संभाव्य धोके देखील ईटीव्हीने वारंवार शासनाच्या लक्षात आणून दिले होते. पोलीस प्रशासनाने याची दखल घेत दोन मजले असलेली नवीन इमारत कदीम जालना पोलीस ठाण्याला दिली आहे. भव्य परिसर आणि 19 खोल्या पोलिसांच्या ताब्यात येणार आहेत.