ETV Bharat / state

जालन्यात नवीन इमारतीसाठी पोलीस प्रशासन नरबळीच्या प्रतीक्षेत?

जुना जालना भागात दीडशे वर्षांपूर्वीची एक इमारत आहे. या इमारतीमध्येच सध्या कदीम जालना पोलीस ठाणे कार्यरत आहे. जीर्ण झालेल्या या इमारतीची बकाल अवस्था झाली आहे. त्यामुळे पोलिसांना मोठा त्रास सहन करावा लागत आहे.

पोलीस ठाणे
author img

By

Published : Nov 4, 2019, 10:48 PM IST

जालना - जुना जालना भागातील दीड लाख लोकांच्या सुरक्षेची जबाबदारी फक्त 72 पोलीस कर्मचाऱ्यांवर आहे. मात्र, या कर्मचाऱ्यांची जबाबदारी कोणावर? असा प्रश्न निर्माण झाल्यामुळे हे कर्मचारी आता हवालदिल झाले आहेत. लघुशंकेला तर ठिकाणचं नाही. बसण्याची सर्वच ठिकाणे धोक्यात आली आहेत. त्यामुळे या सैनिकांनी लढायचे कोणाच्या भरोशावर? असा प्रश्न उपस्थित झाला आहे. रविवारी रात्री पोलीस ठाण्याच्या महत्त्वाच्या भागाचे छत कोसळले. या घटनेमुळे पोलीस प्रशासन नरबळीची प्रतीक्षा करीत आहे का? असा प्रश्नही उपस्थित केला जात आहे.

जालन्यात नवीन इमारतीसाठी पोलीस प्रशासन नरबळीच्या प्रतीक्षेत?

हेही वाचा- दुष्काळासह मंदीच्या फेऱ्यातील वाहन उद्योगाला सणांमधून मिळाली 'संजीवनी'

जुना जालना भागात दीडशे वर्षांपूर्वीची एक इमारत आहे. या इमारती मध्येच सध्या कदीम जालना पोलीस ठाणे कार्यरत आहे. जीर्ण झालेल्या या इमारतीची चार-पाच वर्षाला रंग देण्याशिवाय कुठलीही दुरुस्ती करण्यात आलेली नाही. त्यामुळे विटांनी, माती आणि प्लास्टर सोडून दिले आहे. कुठल्याही कोपऱ्यातून पाणी खाली उतरत आहे. यातूनच रविवारी रात्री आठ वाजेच्या सुमारास वायरलेस संच असलेल्या कक्षाचा छत कोसळला. सुदैवाने यामध्ये कोणालाही इजा झाली नाही. दोन महिन्यापूर्वीच हे छत कोसळण्याची शक्यता असल्यामुळे त्याची डागडुजी करण्यात आली होती. आज ते कोसळले. या कक्षाच्या बाजूलाच अतिमहत्वाचे असे पोलिसांची सीसीटीव्ही यंत्रणा सीएसटीएन यंत्रणा, महत्त्वाच्या कागदपत्रांची कपाटे आणि समोरच ठाणे आमदाराचा टेबल आहे. या महत्त्वाच्या बाबी असताना पोलीस प्रशासन मात्र याकडे दुर्लक्ष करीत आहे. यामध्ये विशेष बाब म्हणजे जिथे हे छत कोसळले त्याच छताखाली रात्री-बेरात्री कर्तव्य बजावून आलेले आणि जाणारे पोलीस कर्मचारी आणि महिला कर्मचारी विश्रांती घेतात. कदाचित हे छत मध्यरात्री कोसळले असते तर जीवित होण्याचीही शक्यता होती. असे असतानाही पोलीस प्रशासन मात्र याकडे सोयीस्कर दुर्लक्ष करीत आहे.

हेही वाचा- स्वाभिमानी शेतकरी संघटनेचे मंत्रालयासमोर आंदोलन

अधिकारी आपल्या खुर्चीतून उठून गावात फिरायला तयार नाहीत. आपल्या सहकाऱ्यांच्या अडचणी सोडवण्यासाठी पोलीस ठाण्यात चक्कर करत नाहीत. त्यांना बसायला एसी, रुम, फिरायला अत्याधुनिक गाड्या, या सर्व सुविधा असताना या पोलीस ठाण्याच्या कर्मचाऱ्यांना मात्र लघुशंकेला ही जागा नाही. त्यामुळे कर्मचाऱ्यासह, आरोपींची इथे कुचंबना होत आहे. याच इमारतीच्या बाजूला अत्यंत महत्त्वाची अशी गोपनीय शाखा आहे. ज्या शाखेमधून गोपनीय माहिती शासनाला पुरविली जाते. मात्र, या शाखेचे देखील छत कोसळण्याच्या परिस्थितीत आहे. तिन्ही बाजूने पाणी येत असून फक्त भिंतीवर ठेवलेल्या कॉलमला तडे गेले आहेत. त्यामुळे कर्मचारी जीव मुठीत घेऊन आणि टेबल वर पाहण्यापेक्षा तडे गेलेल्या कॉलम कडे बघूनच काम करतात.

विशेष बाब म्हणजे चार महिन्यापूर्वी लोकसभेच्या निवडणुका झाल्या आणि आणि रात्री मतमोजणीचा बंदोबस्त करुन सकाळी उशिरा ड्युटीवर आलेल्या तालुका जालना पोलीस ठाण्यातील महिला कर्मचाऱ्यांच्या अंगावर छत कोसळले असते. मात्र, सुदैवाने तसे झाले नाही. याकडे पोलीस प्रशासन लक्ष का देत नाही? असा प्रश्न उपस्थित करुन आम्ही लढायचे कोणाच्या भरोशावर असेही आता पोलीस कर्मचारी बोलत आहेत. त्यामुळे इमारतीमध्ये बसणाऱ्या कर्मचाऱ्यांपेक्षा सुरक्षिततेच्या कारणावरुन बाहेर पटांगणामध्ये बसणारे कर्मचारीच दिसत आहेत. इमारत पडली तर पोलीस प्रशासनाला कर्मचार्‍यांसह महत्त्वाची कागदपत्रे आणि अत्याधुनिक यंत्रणाही गमवावी लागेल यात शंका नाही.

Intro:जुना जालना भागातील दीड लाख लोकांच्या सुरक्षेची जबाबदारी फक्त 72 पोलिस कर्मचाऱ्यांवर आहे .मात्र या कर्मचाऱ्यांची जबाबदारी कोणावर ?असा प्रश्न निर्माण झाल्यामुळे हे कर्मचारी आता हवालदिल झाले आहेत. लघुशंकेला तर ठिकाणचं नाही,आणि बसण्याची सर्वच ठिकाणे धोक्यात आली आहेत. त्यामुळे या सैनिकांनी लढायचे कोणाच्या भरोशावर असा प्रश्न उपस्थित करून, रविवारी रात्री पोलीस ठाण्याच्या महत्वाच्या भागाचे छत कोसळले या घटनेमुळे पोलीस प्रशासन नरबळीची प्रतीक्षा करीत आहे का? असा प्रश्नही उपस्थित केला जात आहे.

Body:जुना जालना भागात दीडशे वर्षांपूर्वीची एक इमारत आहे. या इमारती मध्येच सध्या कदीम जालना पोलीस ठाणे कार्यरत आहे. जीर्ण झालेल्या या इमारतीची चार-पाच वर्षाला रंग देण्याशिवाय कुठलीही दुरुस्ती करण्यात आलेली नाही .त्यामुळे विटांनी, माती आणि प्लास्टर सोडून दिले आहे, कुठल्याही कोपऱ्यातून पाणी खाली उतरत आहे, यातूनच रविवारी रात्री आठ वाजेच्या सुमारास वायरलेस संच असलेल्या कक्षाचा छत कोसळला .सुदैवाने यामध्ये कोणालाही इजा झाली नाही. दोन महिन्यापूर्वीच हे छत कोसळण्याची शक्यता असल्यामुळे त्याची डागडुजी करण्यात आली होती .आणि आज ते कोसळले. या कक्षाच्या बाजूलाच अतिमहत्वाचे असे पोलिसांची सीसीटीव्ही यंत्रणा सीएसटीएन यंत्रणा, महत्त्वाच्या कागदपत्रांची कपाटे आणि समोरच ठाणे आमदाराचा टेबल आहे. या महत्त्वाच्या बाबी असताना पोलीस प्रशासन मात्र याकडे दुर्लक्ष करीत आहे. यामध्ये विशेष बाब म्हणजे जिथे हे छत कोसळले त्याच छताखाली रात्री-बेरात्री कर्तव्य बजावून आलेले आणि जाणारे पोलीस कर्मचारी आणि महिला कर्मचारी विश्रांती घेतात. कदाचित हे छत मध्यरात्री कोसळले असते तर जीवित होण्याचीही शक्यता होती. असे असतानाही पोलीस प्रशासन मात्र याकडे सोयीस्कर दुर्लक्ष करीत आहे.अधिकारी आपल्या खुर्चीतून उठून गावात फिरायला तयार नाहीत, आपल्या सहकाऱ्यांच्या अडचणी सोडवण्यासाठी पोलीस ठाण्यात चक्कर करत नाहीत,त्यांना बसायला एसी,रुम, फिरायला अत्याधुनिक गाड्या, या सर्व सुविधा असताना या पोलीस ठाण्याच्या कर्मचाऱ्यांना मात्र लघुशंकेला ही जागा नाही. त्यामुळे कर्मचाऱ्यासह ,आरोपींची इथे कुचंबना होत आहे. याच इमारतीच्या बाजूला अत्यंत महत्त्वाची अशी गोपनीय शाखा आहे. ज्या शाखेमधून गोपनीय माहिती शासनाला पुरविली जाते मात्र या शाखेचे देखील छत कोसळण्याच्या परिस्थितीत आहे. तिन्ही बाजूने पाणी येत असून फक्त भिंतीवर ठेवलेल्या कॉलमला तडे गेले आहेत. त्यामुळे कर्मचारी जीव मुठीत घेऊन आणि टेबल वर पाहण्यापेक्षा तडे गेलेल्या कॉलम कडे बघूनच काम करतात. विशेष बाब म्हणजे चार महिन्यापूर्वी लोकसभेच्या निवडणुका झाल्या आणि आणि रात्री मतमोजणीचा बंदोबस्त करून सकाळी उशिरा ड्युटीवर आलेल्या तालुका जालना पोलिस ठाण्यातील महिला कर्मचाऱ्यांच्या अंगावर ही तालुका पोलिस ठाण्यातच छत कोसळला असता .सुदैवाने उशिरा आल्यामुळेत्या बचावल्या त्याहीपेक्षा भयानक परिस्थिती कालची होती. याकडे पोलीस प्रशासन लक्ष का देत नाही असा प्रश्न उपस्थित करून आम्ही लढायचे कोणाच्या भरोशावर असेही आता पोलीस कर्मचारी बोलत आहेत .त्यामुळे इमारतीमध्ये बसणाऱ्या कर्मचाऱ्यां पेक्षा सुरक्षिततेच्या कारणावरून बाहेर पटांगणामध्ये बसणारे कर्मचारीच दिसत आहेत.
एक मात्र नक्की इमारत पडली तर पोलीस प्रशासनाला पल्या कर्मचार्‍यांसह महत्त्वाची कागदपत्रे आणि अत्याधुनिक यंत्रणाही गमवावी लागेल यात मात्र शंका नाही.

Conclusion:
ETV Bharat Logo

Copyright © 2024 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.