जालना - कोविडमुळे बंद करण्यात आलेली जालना ते दादर ही जनशताब्दी एक्सप्रेस रेल्वे आज पुन्हा सुरू करण्यात आली आहे. मात्र, वेळेत बदल झाल्याने या गाडीतून किती प्रवासी प्रवास करतील हे अद्याप निश्ची नाही. तर आज 11 महिन्यानंतर सुरू झालेल्या या रेल्वेमधून 282 प्रवाशांनी प्रवास केला.
पहिल्या दिवशी 282 प्रवाशांनी केले आरक्षण -
जालना ते दादर दरम्यान धावणारी जनशताब्दी एक्सप्रेस रेल्वे आता जालना ते छत्रपती शिवाजी टर्मिनल इथपर्यंत जाणार आहे. पूर्वी या रेल्वेची वेळ सकाळी 4.40 वाजता होती. ती आता 8.30 वाजता झाली आहे. त्यामुळे पूर्ण दिवस प्रवासात जातो. पर्यायाने व्यापाऱ्यांसाठी आणि शासकीय कर्मचाऱ्यांसाठी ही वेळ सोयीस्कर नाही. या नव्या वेळेला प्रवाशांचा प्रतिसाद किती मिळतो, यावर यावर रेल्वेचे वेळापत्रक अवलंबून आहे.
डब्यांमध्ये झाले आहे वाढ -
कोविडपूर्वी ही रेल्वे धावत असताना 12 सामान्य, तर 2 वातानुकूलित असे एकूण 14 डबे होते. आता या डब्यांमध्ये वाढ झाली आहे. त्यानुसार 3 वातानुकूलित आणि 17 सामान्य असे एकूण 20 डबे या जनशताब्दी रेल्वे एक्सप्रेसला लागले आहेत. तसेच जालना येथून सकाळी 8.30 वाजता निघून छत्रपती शिवाजी टर्मिनस येथे दुपारी 4.20 वाजता पोहोचेल. तस परतीच्या प्रवासामध्ये दुपारी 12.10 वाजता छत्रपती शिवाजी टर्मिनस येथून निघून रात्री 7.45 वाजता जालना येथे पोहोचणार आहे.
हेही वाचा - अशा भानगडी होत असतील तर या सरकारला लवकरच जावं लागेल...