ETV Bharat / state

प्राथमिक आरोग्य केंद्राचे काम निकृष्ट, सभापतींच्या काम बंद आदेशाला केराची टोपली

शासनाने ४ कोटी ४१ लाख रुपये खर्च करून प्राथमिक आरोग्य केंद्र आणि ४ कर्मचाऱ्यांच्या निवासस्थानाचे काम हाती घेतले आहे. मात्र, बांधकाम निकृष्ट दर्जाचे होत असल्याचे आरोप होत आहेत.

आरोग्य केंद्र
author img

By

Published : Jun 29, 2019, 7:46 PM IST

जालना - जालना तालुक्यातील पिंपळगाव येथे प्राथमिक आरोग्य केंद्राची इमारत आणि निवासस्थानांचे बांधकाम निकृष्ट दर्जाचे होत आहे. या आरोपावरून जालना पंचायत समितीचे सभापती पांडुरंग डोंगरे यांनी हे काम बंद करण्याचे आदेश दिले आहेत. मात्र कंत्राटदाराने या आदेशाला केराची टोपली दाखवत काम सुरूच ठेवले आहे.

प्राथमिक आरोग्य केंद्राचे काम निकृष्ट असल्याचे आरोप होत आहेत

जालना राजूर रस्त्यावर १५ कि.मी अंतरावर पीर पिंपळगाव हे महत्त्वाचे गाव आहे. या प्राथमिक आरोग्य केंद्राला अन्य ४ उपकेंद्र जोडलेले आहेत. त्यामुळे परिसरात या आरोग्य केंद्राचा जनतेला मोठा फायदा होतो. त्यासाठी शासनाने ४ कोटी ४१ लाख रुपये खर्च करून प्राथमिक आरोग्य केंद्र आणि ४ कर्मचाऱ्यांच्या निवासस्थानाचे काम हाती घेतले आहे. सुमारे २५ कर्मचारी या उपकेंद्रा अंतर्गत काम करतात.

मागील महिनाभरापासून सुरू झालेल्या या इमारतीचे काम कृष्णा कोरडे या कंत्राटदाराला दिले आहे. मात्र, हे काम निकृष्ट दर्जाचे होत असल्याच्या तक्रारी येत होत्या. त्यानंतर जालना पंचायत समितीचे सभापती पांडुरंग डोंगरे यांनी २० जून रोजी काम बंद करण्याचे आदेश दिले होते.

सर्व सत्ताधारी एकाच पक्षाचे तरी....

पीर पिंपळगाव येथील या प्राथमिक आरोग्य केंद्राचे बांधकाम जालना जिल्हा परिषदेअंतर्गत सुरू आहे. विशेष म्हणजे जिल्हा परिषदेत अध्यक्ष अनिरुद्ध खोतकर हे शिवसेनेचे आहेत. तसेच जालना पंचायत समितीचे सभापती पांडुरंग डोंगरे, पिंपळगाव येथील सरपंच मनीषा कृष्णा कोरडे याही शिवसेना पक्षाच्या आहेत. आरोग्य केंद्राचे काम मिळाले गुत्तेदारही शिवसेनेचे कार्यकर्ते तथा सरपंचाचे पती आहेत. यासंदर्भात येथील डॉक्टर मिर्झा बेग यांनी आपला या बांधकामाशी प्रत्यक्ष काही संबंध नाही, असे बोलून हात झटकले आहेत.

Intro:जालना तालुक्यातील पिंपळगाव येथे होत असलेल्या प्राथमिक आरोग्य केंद्राच्या इमारतीचे आणि निवासस्थानांचे काम निकृष्ट दर्जाचे होत आहे .या आरोपावरून जालना पंचायत समितीचे सभापती पांडुरंग डोंगरे यांनी हे काम बंद करण्याचे आदेश दिले आहेत.

Body:जालना राजुर रस्त्यावर 15 किलोमीटर अंतरावर पीर पिंपळगाव हे महत्त्वाचे गाव आहे. या प्राथमिक आरोग्य केंद्राला अन्य चार उपकेंद्र जोडलेले आहेत त्यामुळे परिसरात या आरोग्य केंद्राचा जनतेला मोठा फायदा होतो. त्यासाठी शासनाने 4 कोटी 41 लाख रुपये खर्च करून येथे प्राथमिक आरोग्य केंद्र आणि चार कर्मचाऱ्यांच्या निवासस्थानासाठी इमारत बांधकाम हाती घेतले आहे. सुमारे 25 कर्मचारी या उपकेंद्र अंतर्गत काम करतात. मागील महिनाभरापासून सुरू झालेल्या या इमारतीचे काम कृष्णा कोरडे या कंत्राटदाराला दिले आहे .मात्र हे काम निकृष्ट दर्जाचे होत असल्याचा आरोप जालना पंचायत समितीचे सभापती पांडुरंग डोंगरे यांनी भेट दिली असता त्यांच्या लक्षात आले. त्यामुळे त्यांनी गुरुवार दिनांक 20 रोजी हे काम बंद करण्याचे आदेश दिले होते, मात्र कंत्राटदाराने या आदेशाला केराची टोपली दाखवत आजही काम सुरूच ठेवले आहे.

**** जिल्हा परिषदेला घरचा आहेर****
पीर पिंपळगाव येथील या प्राथमिक आरोग्य केंद्राचे बांधकाम जालना जिल्हा परिषदेअंतर्गत सुरू आहे. विशेष म्हणजे ही जिल्हा परिषदेत ,अध्यक्ष अनिरुद्ध खोतकर हे शिवसेनेचे, जालना पंचायत समितीचे सभापती पांडुरंग डोंगरे हे शिवसेनेचे, पिंपळगाव येथील सरपंच श्रीमती मनीषा कृष्णा कोरडे या शिवसेनेच्या, आणि आणि या प्राथमिक आरोग्य केंद्राचे काम मिळाले गुत्तेदार हे देखील शिवसेनेचे कार्यकर्ते तथा सरपंचाचे पती आहेत .असे असतानाही या कामाबद्दल येणाऱ्या तक्रारी या या विचारात घेण्या सारख्या आहेत .यासंदर्भात येथील डॉक्टर मिर्झा बेग यांनी आपला या बांधकामाशी प्रत्यक्ष काही संबंध नाही असे बोलून हात झटकले आहेत.

Conclusion:
ETV Bharat Logo

Copyright © 2024 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.