जालना - शहरातील रेल्वेस्थानक भर उन्हाळ्यामध्ये रिकामटेकड्यांसाठी आराम करण्याचे ठिकाण बनले आहे. दुपारच्या वेळी प्रवासी नसलेले लोक स्थानकामध्ये येवून झोपा काढत आहेत. त्याचा त्रास इतर प्रवाशांना होत आहे. या समस्येकडे रेल्वे प्रशासानाचेही दु्र्लक्ष होत आहे.
या रिकामटेकड्या लोकांमुळे मात्र, खऱ्या प्रवाशांना त्रास सहन करावा लागत आहे. याबाबत रेल्वे पोलीस बलदेखील काहीच बोलण्यास तयार नाही. अपुऱ्या कर्मचारी संख्येमुळे कामाचा ताण पडत असल्याचे रेल्वे प्रशासनाचे म्हणणे आहे. स्थानकावर दिवसेंदिवस रेल्वेच्या संख्येत वाढ होत आहे. मात्र, त्यामानाने कर्मचाऱ्यांची संख्या अपुरी आहे. स्थानकामध्ये येण्यासाठी प्लॅटफॉर्म तिकीटही अनेकजण काढत नाहीत, यासंदर्भात विचारणादेखील होत नाही, त्यामुळे स्थानकांत रिकामटेकड्यांचा मुक्त प्रवेश सुरू आहे.