जालना - गेल्या अनेक वर्षांपासून बेवारस असलेल्या दुचाकी वाहनांचा कदीम जालना पोलीस लिलाव करण्याच्या तयारीत आहेत. आठ दिवसांपूर्वीच जुन्या कदीम जालना पोलीस ठाण्याच्या इमारतीमध्ये अशाच जप्त केलेल्या चारचाकी वाहनांना आग लागून त्यात अनेक चारचाकी वाहने जळून खाक झाले आहेत.
142 वाहनांचा लिलाव
गेल्या वर्षानूवर्षे कदीम जालना पोलीस ठाण्यात विविध गुन्ह्यांमध्ये जप्त असलेली दुचाकी वाहने पडून आहेत. तसेच अनेक बेवारस वाहनेही येथे आहेत. हे पोलीस ठाणे जुन्या इमारतीमधून नव्या इमारतीमध्ये स्थलांतरित झाले. त्याचसोबत ही पडून असलेली बेवारस वाहने देखील स्थलांतरित करण्यात आली. त्यातील काही वाहने आजही चांगल्या परिस्थितीत आहेत. त्यामुळे या वाहनांची ओळख पटवून आणि कायदेशीर बाबी पूर्ण करून संबंधिताने वाहन घेऊन जावे, असे आवाहन पोलीस निरीक्षक प्रशांत महाजन यांनी केले आहे. जप्त केलेली 183 वाहने पोलिसांनी सुरक्षिततेच्या दृष्टीने कदीम जालना पोलीस ठाण्याच्या आवारात ठेवलेले आहेत. त्यापैकी 142 वाहनांचा लिलाव होणार आहे.
प्रत्येक वाहनावर क्रमांक
वाहनांची संख्या लक्षात घेण्यासाठी प्रत्येक वाहनावर पोलीस ठाणे क्रमांकही टाकलेला आहे. त्यानुसार सध्या येथे 183 दुचाक्या धूळ खात पडलेल्या आहेत. त्यापैकी 142 वाहनांचा लिलाव पोलीस करणार आहेत. लिलाव करण्यापूर्वी ज्या बँकेचा, आर्थिक संस्थेचा या वाहनावर बोजा आहे त्या संस्थेने कागदपत्रांची पूर्तता करून ओळख पटवून ही वाहने घेऊन जावीत, असे आवाहन करण्यात आले आहे. त्यासोबत जाहीर केलेल्या यादीमध्ये संबंधित वाहनाचे नंबर आणि चेसी क्रमांक ही देण्यात आले आहेत. त्यामुळे ज्यांचे हे वाहन आहे त्यांना ते सोडून घेणे सोपे जाणार आहे. येत्या आठ पंधरा दिवसात जर ही वाहने सोडवली नाहीत तर पोलीस या वाहनांचा लिलाव करून आलेली रक्कम सरकारी खात्यात जमा करण्याचा ही तयारीत आहेत.
हेही वाचा - परतूर शहरातून दोन क्विंटल गोमांस जप्त; पाच जण अटकेत
हेही वाचा - मृताच्या नातेवाइकांनी केली रुग्णालयाची तोडफोड