ETV Bharat / state

जालना : तालुका पोलीस ठाण्याचे छत कोसळले, जीवितहानी नाही - police

निजामकालीन इमारतीत कुठलीही दुरुस्ती करण्यात न आल्यामुळे गुरुवारी सकाळी नऊ वाजण्याच्या सुमारास तालुका पोलीस ठाण्याच्या महिला विभागातील छत कोसळले.

तालुका पोलीस ठाण्याचे छत कोसळले
author img

By

Published : Apr 25, 2019, 4:26 PM IST

जालना - शहरात असलेल्या जालना तालुका पोलीस ठाण्याचे छत कोसळले. ही घटना गुरुवारी सकाळी नऊ वाजण्याच्या सुमारास घडली. यात कोणतीही जीवितहानी झाली नाही.

तालुका पोलीस ठाण्याचे छत कोसळले

तालुका जालना पोलीस ठाणे आणि कदीम जालना पोलीस ठाण्याच्या इमारती या निजामकालीन आहेत. सध्या ज्या ठिकाणी जालना तालुका पोलीस ठाणे आहे, त्याठिकाणी पूर्वी जिल्हा कोषागार कार्यालय होते. हे कोषागार कार्यालय जिल्हाधिकारी कार्यालयात नवीन इमारतीमध्ये स्थलांतरित झाल्यानंतर येथे तालुका जालना पोलीस ठाणे स्थलांतरित करण्यात आले. मात्र, निजामकालीन इमारतीत कुठलीही दुरुस्ती करण्यात न आल्यामुळे काल सकाळी नऊ वाजेच्या सुमारास महिला विभागातील छत कोसळले.

रोज सकाळी १० वाजण्याच्या सुमारास गोपनीय शाखेच्या बाजूला असलेल्या या कार्यालयात महिला पोलीस कर्मचारी जमा होतात. जिल्हाभरातील टपालाची देवाण-घेवाण करतात. २३ एप्रिलला मतदान असल्यामुळे सर्व महिला कर्मचारी इतरत्र कार्यरत होत्या. त्यामुळे दिनांक २४ एप्रिलला सकाळी येण्यासाठी थोडा उशीर झाल्याने जीवितहानी टळली.

या घटनेमुळे पोलीस कर्मचाऱ्यांच्या सुरक्षेचा प्रश्न पुन्हा एकदा ऐरणीवर आला आहे. उंचावरून कोसळलेल्या या छतामुळे निश्चितच मोठ्या प्रमाणात जीवितहानी झाली असती. तसेच या इमारतीत विद्युत साहित्यही जुनेच आहे. त्यामुळे शॉर्टसर्किटची शक्यताही मोठी आहे. निजामकालीन इमारत असल्यामुळे या इमारतीचे छत लाकूड आणि लोखंडाच्या सहाय्याने तयार करण्यात आलेले आहे.

Intro:जालना शहरात असलेल्या तालुका जालना पोलीस ठाण्याचे छत काल सकाळी नऊ वाजेच्या सुमारास कोसळले मात्र सुदैवाने यामध्ये जीवितहानी झाली नाही.

Body:तालुका जालना पोलीस ठाणे आणि कदीम जालना पोलीस ठाणे हे निजामकालीन बांधलेल्या इमारती मध्ये आहेत .सध्या ज्या ठिकाणी तालुका जालना पोलीस ठाणे आहे त्या ठिकाणी पूर्वी जिल्हा कोषागार कार्यालय होते. हे कोषागार कार्यालय जिल्हाधिकारी कार्यालयात नवीन इमारतीमध्ये स्थलांतरित झाल्यानंतर येथे तालुका जालना पोलीस ठाणे स्थलांतरित करण्यात आले .मात्र निजाम कालीन इमारतीत कुठलीही दुरुस्ती करण्यात न आल्यामुळे काल सकाळी नऊ वाजेच्या सुमारास महिला विभागातील छत कोसळले .रोज सकाळी दहा वाजेच्या सुमारास गोपनीय शाखेच्या बाजूला असलेल्या या कार्यालयात महिला पोलीस कर्मचारी जमा होतात .आणि जिल्ह्याभरातील टपालाची देवाण-घेवाण करतात .दिनांक 23 रोजी मतदान असल्यामुळे सर्व महिला कर्मचारी इतरत्र कार्यरत होत्या .त्यामुळे दिनांक 24 रोजी सकाळी येण्यासाठी थोडा उशीर झाल्याने जीवित हानी टळली .रोज नऊ वाजता येणाऱ्या महिला कर्मचारी काल थोडा उशीरआल्या. आणि नऊच्या सुमारास हे छत कोसळले .त्यामुळे कोणतीही जीवितहानी झाली नाही .
मात्र पोलीस कर्मचाऱ्यांच्या सुरक्षेचा प्रश्न पुन्हा एकदा ऐरणीवर आला आहे. उंचावरून कोसळलेल्या या छंतामुळे निश्चितच मोठ्या प्रमाणात जीवित हानी झाली असती .तसेच या इमारतीत विद्युत साहित्यही जुनेच आहे .त्यामुळे शॉर्टसर्किटची शक्यताही मोठी आहे .निजाम कालीन इमारत असल्यामुळे छत हे लाकूड आणि लोखंडाच्या मदतीने तयार करण्यात आलेले आहे.

Conclusion:
ETV Bharat Logo

Copyright © 2025 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.