ETV Bharat / state

दोस्त दोस्त ना रहा ! पैशासाठी मित्राचा खून, ४ तासात आरोपी अटकेत

जुना जालना परिसरात कुंडलिका नदीच्या काठालगत असलेल्या किल्ला जिनिंग भागात एका २२ वर्षीय तरुणाचा चाकूने भोसकून खून झाल्याची घटना घडली होती. या प्रकरणातील आरोपीला पोलिसांनी ४ तासांत शोधून काढले.

author img

By

Published : Apr 25, 2019, 11:58 PM IST

दोस्त दोस्त ना रहा ! पैशासाठी मित्राचा खून, ४ तासात अरोपी अटकेत

जालना - जुना जालना परिसरात कुंडलिका नदीच्या काठालगत असलेल्या किल्ला जिनिंग भागात एका २२ वर्षीय तरुणाचा चाकूने भोसकून खून झाल्याची घटना घडली होती. ही घटना आज (गुरुवारी) सकाळी १० वाजण्याच्या सुमारास उघडकीस आली. कुमार शरदचंन्द्र झुंजूर (२२) असे या खून झालेल्या तरुणाचे नाव होते. या प्रकरणातील आरोपीला पोलिसांनी ४ तासांत शोधून काढले.

याप्रकरणी पोलिसांनी विजय तुळशीराम मुंगसे (मस्तगड भाग, मल्लाव गल्ली ) याला ताब्यात घेतले आहे. आपणच खून केला असल्याची कबुलीही विजयने दिली आहे.

सकाळी खून झाल्याची घटना उघडकीस आल्यानंतर अप्पर पोलीस अधीक्षक समाधान पवार, परिविक्षाधीन पोलीस उपअधीक्षक राहुल गायकवाड, स्थानिक गुन्हा शाखेचे पोलीस निरीक्षक गौर, यांच्यासह अन्य अधिकाऱ्यांनी घटनास्थळाची पाहणी केली. त्यानंतर स्थानिक गुन्हे शाखेच्या पोलिसांनी तपासाची चक्रे फिरवली आणि मिळालेल्या माहितीवरून मल्लाव गल्लीत राहणाऱ्या तुळशीराम मुंगसे या युवकाने हा खून केल्याची माहिती पोलिसांना मिळाली. त्यानुसार पोलिसांनी त्याला ताब्यात घेतले.

विजयने सांगितले, काही दिवसांपूर्वी मी १ लाख २० हजार रुपये कुमार झुंजूरकडे १ दिवस ठेवण्यासाठी दिले होते. त्यानंतर त्याला पैसे मागितल्यानंतर सदरील पिशवी घरच्यांनी कुठेतरी फेकून दिली आहे, असे सांगून तो वारंवार पैसे देण्याचे टाळत होता. मी नेहमीच पैशाची मागणी केली, मात्र प्रत्येकवेळी कारणे सांगून पैसे देण्याचे टाळत होता. त्यामुळे मस्तंगडवर बोलावले त्यावेळीही त्याने पैसे देण्याचे टाळले. त्यामुळे माझा राग अनावर झाला आणि तो पुढे चालत असताना बाजूला पडलेल्या बांबूने त्याच्यावर मी २ वार केले. त्यामुळे तो जमिनीवर पडला, त्यानंतर माझ्या कमरेला असलेल्या चाकूने मी त्याच्यावर वार केले.

Intro:पैशाच्या कारणावरून मित्रानेच केला मित्राचा खून 4 घंटे मध्ये तपास

सोबत फोटो
आज दिनांक 25 रोजी पहाटे दहा वाजताच्या सुमारास उघडकीस आलेल्या कुमार शरदचंद्र झुंजुर (वय 28) या तरुणाच्या खुनाचा तपास लावण्यात पोलिसांना यश आले आहे.
अवघ्या 2 घंटे मध्ये आरोपी विजय तुळशीराम मुंगसे याला पोलिसांनी ताब्यात घेतले आहे .आणि त्याने खुनाची कबुली दिली आहे.
कुंडलिका नदीच्या काठावर असलेल्याकिल्ला जिनिग मध्ये कुमार चा खून झाल्याची घटना सकाळी उघडकीस आल्यानंतर अप्पर पोलीस अधीक्षक समाधान पवार, परिविक्षाधीन पोलीस उपअधीक्षक राहुल गायकवाड ,स्थानिक गुन्हा शाखेचे पोलिस निरीक्षक गौर, यांच्यासह अन्य अधिकाऱ्यांनी घटनास्थळाची पाहणी केली .त्यानंतर स्थानिक गुन्हा शाखेच्या पोलिसांनी तपासाची चक्रे फिरवली आणि मिळालेल्या माहितीवरून मल्लाव गल्ली ,मस्तगड, भागात राहणाऱ्या तुळशीराम मुंगसे या युवकाने हा खून केल्याची माहिती पोलिसांना मिळाली. त्यानुसार त्याला ताब्यात घेतले आणि चौकशी केली असता मुंगसे याने सांगितले की ,"काही दिवसापूर्वी मी एक लाख वीस हजार रुपये एक दिवस ठेवण्यासाठी कुमार झुंजूर कडे दिले होते. नंतर मी ते पैसे परत मागितले परन्तु त्याने सदरील पिशवी त्याच्या घरच्यांनी कुठेतरी फेकून दिली आहे सांगून पैसे देण्याचे वारंवार टाळले. मी नेहमीच या पैशाची मागणी केली ,मात्र तो काही ना काही बहाने सांगून टाळून द्यायचा .त्यामुळे काल दिनांक 24 रोजी त्याला मस्तंगड वर बोलावले तिथे देखील त्याने मागचेच बहाने सांगणे सुरू केले. त्यामुळे किल्ला परिसरात असलेल्या मंदिराकडे आलो. रिक्षाला परत पाठवून दिले त्यावेळी देखील त्यांच्याकडे पैशाची मागणी करताचत्यांनी पूर्वीच बहाने सांगण्यास सुरुवात केली. माझा राजा अनावर झाला आणितो पुढे चालत असतानाच बाजूलाच पडलेल्या बांबूने मी दोन वार केले .या वार केल्यामुळे जमिनीवर पडला आणि नंतर माझ्या कमरेला असलेल्या चाकूने त्याच्यावर वार केले "
अशी कबुली आरोपी विजय मुंगसे याने दिले आहे.
Body:खुनाची बातमी दुपारी लागली आहे, त्यामधील व्हिजवल वापरात घ्यावेत ही विनंतीConclusion:
ETV Bharat Logo

Copyright © 2024 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.