जालना- शहरातील साईनाथ नगर भागात राहणाऱ्या एका 33 वर्षीय व्यक्तीला कोरोनाची लागण झाली असल्याचा अहवाल जिल्हा प्रशासनाला प्राप्त झाला आहे.जालना शहरात राहणारा हा व्यक्ती औरंगाबाद येथील शासकीय महाविद्यालय अर्थात घाटीमध्ये कार्यरत असल्याची माहिती पुढे आली आहे.
जालना शहरातील हा व्यक्ती औरंगाबाद येथेच उपचार घेत आहे. दरम्यान, जालना येथील रहिवासी असल्यामुळे या रुग्णाची पार्श्वभूमी आणि हा रुग्ण अन्य किती लोकांच्या सानिध्यात आला होता याचा तपास जिल्हा प्रशासन घेत आहे.
औरंगाबाद जिल्हा प्रशासनाने जालना जिल्हा प्रशासनाला ही माहिती कळवून पुढील उपाययोजना कळविण्याचे निर्देश दिलेले आहेत.