जालना - नगरपालिकेत भ्रष्टाचार झाल्याच्या आरोपांची शहानिशा करण्यासाठी नियुक्त करण्यात आलेल्या चौकशी समितीने शनिवार दिनांक 3 ऑगस्टला आपला तळ हलवला आहे. शुक्रवारपासून ही चौकशी सुरू झाली होती. या समितीने तळ हलवल्यामुळे निश्चितच या प्रकरणात मोठी व्यक्ती असणार, असा अंदाज लावला जात आहे.
प्रसारमाध्यमांना चकवा देत समितीने जिल्हाधिकारी कार्यालयाच्या सभागृहात आपला तळ हलवला
26 जुलैची लांबलेली चौकशी दोन ऑगस्ट रोजी सुरू झाली. काल सकाळीच हा ताफा नगरपालिकेत दाखल झाल्यानंतर दिवसभर विविध विभागांच्या विभाग प्रमुखांची आणि त्यांच्या दप्तराची करण्यात आली. परंतु या अधिकाऱ्यांनी प्रसार माध्यमांना माहिती देणे आणि बोलणे टाळले. परंतु सूत्रांच्या माहितीनुसार ही चौकशी पाच-सहा दिवस चालणार आहे. आज दुसऱ्या दिवशी प्रसारमाध्यमांना चकवा देत या समितीने जिल्हाधिकारी कार्यालयाच्या सभागृहात आपला तळ हलवला. अत्यंत गोपनीय पद्धतीने तिथेही चौकशी सुरू होती. नगरपालिकेत याविषयी विचारणा केली असता कोणालाही काहीही ही माहीत नाही, असे सर्वजण सांगत होते. मात्र ज्या विभागाची चौकशी सुरू आहे त्या विभाग प्रमुखांना या सभागृहांमध्ये बोलावून ही चौकशी करण्यात आली. नेत्यांचा, नगरपालिकेतील कर्मचाऱ्यांचा हस्तक्षेप टाळण्याच्या उद्देशाने जिल्हाधिकारी कार्यालयाच्या सभागृहात ही चौकशी होत असल्याचे सूत्रांनी सांगितले. त्याच सोबत या चौकशीची व्याप्तीही मोठी असणार असल्याचेही ते म्हणाले. अप्पर आयुक्त शिवानंद टाकसाळे यांच्या अध्यक्षतेखाली पाच जणांची समिती ही चौकशी करीत आहे.
हेही वाचा...
विविध विभागातील भ्रष्टाचार प्रकरणी जालना नगरपालिकेची चौकशी सुरू
काय होणार जालना नगर परिषदेत? चर्चेला उधाण
जालना नगरपालिकेतील भ्रष्टाचार प्रकरणी गुरुवारी होणार महाचौकशी