ETV Bharat / state

जिल्हा परिषदेचा अभियंता मागील दीड वर्षापासून 'बिन पगारी फुल अधिकारी' - jalna nagar parishad news

अभियंता आला; रुजू ही झाला, मात्र त्यांच्यासोबत येणारे दप्तर अजूनही आलेच नाही. त्यामुळे या अभियंत्याचे काम चालू आहे. मात्र, दीड वर्षापासून पगार झालेला नाही. त्यामुळे गेल्या दीड वर्षांपासून संबंधित कर्मचारी 'बिन पगारी, फुल अधिकारी' आहे.

jalna jilha parishad news
दीड वर्षापासून जिल्हा परिषदेचा अभियंता "बिन पगारी फुल अधिकारी"
author img

By

Published : Dec 23, 2019, 7:39 PM IST

Updated : Dec 24, 2019, 4:59 PM IST

जालना - जिल्हा परिषदे अंतर्गत बांधकाम उपविभाग जाफराबाद येथे यु. बी. ओव्हळ ही व्यक्ती उपअभियंता म्हणून कार्यरत आहे. 2 जुलै 2018 रोजी या अभियंत्याची औरंगाबाद जिल्हा परिषदेअंतर्गत असलेल्या कन्नड उप विभागातून जालन्याला बदली झाली.

जिल्हा परिषदेचा अभियंता मागील दीड वर्षापासून 'बिन पगारी फुल अधिकारी'

अभियंता आला; रुजू ही झाला, मात्र त्यांच्यासोबत येणारे दप्तर अजूनही आलेच नाही. त्यामुळे या अभियंत्याचे काम चालू आहे. मात्र, दीड वर्षापासून पगार झालेला नाही. त्यामुळे गेल्या दीड वर्षांपासून संबंधित कर्मचारी 'बिन पगारी, फुल अधिकारी' आहे.

यासंदर्भात जालना जिल्हा परिषदेने औरंगाबाद जिल्हा परिषदेची पत्रव्यवहारही केला आहे. संबंधित प्रकरणी 6 मार्च 2019 ला औरंगाबाद जिल्हा परिषदेला पत्र पाठवून मुळ सेवा पुस्तिका मागवण्यात आली आहे.
मात्र, अभियंता ओव्हाळ यांची औरंगाबाद जिल्हा परिषदेतील चौकशी आणि वसूली सुरू असल्यामुळे दप्तरच बदली झालेल्या ठिकाणी आलेच नाही. शासन निर्णयाप्रमाणे मुळ सेवा पुस्तिका आणि अंतिम वेतन प्राप्त झाल्याशिवाय संबंधित कर्मचाऱ्याचे वेतनही काढता येत नाही.

हेही वाचा - बदनापुरात मुख्य बाजारपेठेतील ज्वेलर्सचे दुकान फोडले

विशेष म्हणजे हे अभियंते कार्यरत आहेत. मात्र, नियमित काम करत नाहीत. नुकत्याच दिनांक 10 डिसेंबरला पार पडलेल्या जिल्हा परिषदेच्या सर्वसाधारण सभेत हा मुद्दा चर्चिला गेला. परंतु, अद्याप यावर तोडगा काढण्यात परिषदेला यश आले नाही.

जिल्हा परिषदेच्या मुख्य कार्यकारी अधिकारी श्रीमती निमा अरोरा यांनी संबंधित अभियंत्यावर कारवाई करणार असल्याचे सांगितले. सर्वसाधारण सभेत दीड वर्षानंतर हा मुद्दा चर्चे आला होता. त्यामुळे लवकरच याप्रकरणी निकाल लागण्याची शक्यता आहे. त्यातच हा अभियंता सहा महिन्यानंतर सेवानिवृत्त होणार असल्याने अभियंता देखील या प्रकरणाकडे गांभीर्याने घेत नाही. मात्र, कागदपत्रांचे काम पूर्ण न झाल्यास सेवानिवृत्ती व वेतनात अडचणी येण्याची शक्यता नाकारता येत नाही.

हेही वाचा - एनआरसी आणि सीएए विरोधात सोमवारी 'भोकरदन बंद'

Intro:"बिन पगारी फुल अधिकारी ही" म्हण एखाद्या रिकाम्यामाणसाला नको ते काम लावून दिल्यानंतर त्याच्या तोंडून निघते .मात्र जालना जिल्हा परिषदेमध्ये खरोखरच असा एक उपअभियंता आहे की जो गेल्या दीड वर्षापासून" बिन पगारी फुल अधिकारी आहे"

Body:जालना जिल्हा परिषद अंतर्गत बांधकाम उपविभाग जाफराबाद येथे यु. बी. ओव्हळ हे गृहस्थ उपअभियंता म्हणून कार्यरत आहेत. दिनांक 2 जुलै 2018 रोजी या अभियंत्याची औरंगाबाद जिल्हा परिषदेअंतर्गत असलेल्या कन्नड उप विभागातून जालन्याला बदली झाली. अभियंता आला आणि रुजू ही झाला, मात्र त्यांच्यासोबत येणारे दप्तर अजूनही आलेच नाही .त्यामुळे या अभियंत्याचे काम चालू आहे मात्र दीड वर्षापासून पगार झाला नाही .यासंदर्भात जालना जिल्हा परिषदेने औरंगाबाद जिल्हा परिषदेची पत्रव्यवहारही केला आहे त्यासंदर्भात दिनांक सहा मार्च 2019 ला औरंगाबाद जिल्हा परिषदेला पत्र पाठवून मुळ सेवा पुस्तिका ही मागविली आहे., मात्र अभियंता ओव्हाळ यांची औरंगाबाद जिल्हा परिषदेतील चौकशी आणि आणि वसूली या सुरू असल्यामुळे दप्तरच इकडे आले नाही. त्यामुळे शासन निर्णयाप्रमाणे मुळ सेवा पुस्तिका आणि अंतिम वेतन(lpc) प्राप्त झाल्याशिवाय संबंधित कर्मचाऱ्याचे वेतनही काढता येत नाही. विशेष म्हणजे हे अभियंते कार्यरत आहेत मात्र नियमित काम करत नाही त्यामुळे नुकत्याच दिनांक 10 डिसेंबर रोजी झालेल्या जिल्हा परिषदेच्या सर्वसाधारण सभेत हा मुद्दा चर्चिला गेला .मात्र आजही हा अधिकारी बिन पगारी फुल अधिकारी आहे.
त्यांनी देखील वेतन मागितले नाही.
दरम्यान जिल्हा परिषदेच्या मुख्य कार्यकारी अधिकारी श्रीमती निमा अरोरा यांनी आता या इंजिनियर वर कारवाई करते असे सांगितले आहे. त्यांच्या अधिकारात या अभियंत्याला बडतर्फ करण्याचे नसले तरी प्राप्त माहितीनुसार त्या या अभियंत्याला सक्तीच्या रजेवर पाठवू शकतात, किंवा जेथून हे अभियंते जिल्हा परिषदेत आले त्या मुख्य अभियंता प्रादेशिक बांधकाम विभाग यांच्याकडे परत पाठवू शकतात .दरम्यान सर्वसाधारण सभेत दीड वर्षानंतर हा मुद्दा चर्चे आला होता त्यामुळे लवकरच याप्रकरणी निकाल लागण्याची शक्यता आहे.
त्यातच हा अभियंता सहा महिन्यानंतर सेवानिवृत्त होणार आहे. त्यामुळे अभियंता देखील या प्रकरणाकडे फारसा गांभीर्याने घेत नाही .मात्र जर इथे कागदपत्रांचे काम पूर्ण झाले नाही तर सेवानिवृत्ती वेतनात अडचणी येण्याची शक्यता नाकारता येत नाही .एक मात्र खरे की फक्त म्हणच नाही तर प्रत्यक्षात असा अधिकारीदेखील जालना जिल्हा परिषदेत पाहायला मिळत आहे.

Conclusion:
Last Updated : Dec 24, 2019, 4:59 PM IST
ETV Bharat Logo

Copyright © 2025 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.