ETV Bharat / state

exclusive : कोरोना रुग्णांकडून वसूल केलेली अतिरिक्त रक्कम मुख्यमंत्री सहायता निधीमध्ये जमा करण्याचे आदेश - अतिरिक्त बील वसूल जालना

या रुग्णालयात महात्मा ज्योतिबा फुले जनआरोग्य योजना असताना रुग्णांकडून बिल आकारल्याच्या तक्रारी नातेवाईकांनी केल्या होत्या. याची शहानिशा करून जिल्हा शल्य चिकित्सक, जालना यांनी दिनांक 25 ऑगस्ट रोजी जिल्हाधिकाऱ्यांना अहवाल सादर केला होता. कोरोना रुग्णांकडून अतिरिक्त बील वसूल

जालना
जालना
author img

By

Published : Sep 4, 2020, 11:01 PM IST

जालना - शहरातील विवेकानंद रुग्णालयाने आठ कोरोना रुग्णांकडून अतिरिक्त वसूल केलेले 1 लाख 93 हजार 968 रुपये मुख्यमंत्री सहायता निधीमध्ये जमा करण्याचे आदेश जिल्हाधिकारी रवींद्र बिनवडे यांनी हॉस्पिटल प्रशासनाला दिले आहेत. जालना जिल्ह्यात कोरोना रुग्णांकडून घेतलेल्या अतिरिक्त बिलाबाबत एखाद्या रुग्णालयावर झालेली ही पहिलीच कार्यवाही आहे. जालना शहरात देऊळगाव राजा रस्त्यावर विवेकानंद रुग्णालय आहे.

जालना

या रुग्णालयाकडून शिल्पा सुरेश अग्रवाल 11 हजार 650, भिमराव गोविंदराव शेजूळ 3 हजार 760, आरती भगवान 16 हजार 520, अंकिता गोपालदास मोर 1 हजार 575, विकास मनोहरलाल तलरेजा व इतर तिघांच्याकडून 1 लाख 60 हजार 481 असे एकूण आठ रुग्णांकडून 1 लाख 93 हजार 968 रुपये अतिरिक्त वसूल केले आहेत. या रुग्णालयात महात्मा ज्योतिबा फुले जनआरोग्य योजना असताना रुग्णांकडून बिल आकारल्याच्या तक्रारी नातेवाईकांनी केल्या होत्या. याची शहानिशा करून जिल्हा शल्य चिकित्सक, जालना यांनी दिनांक 25 ऑगस्ट रोजी जिल्हाधिकाऱ्यांना अहवाल सादर केला होता. तसेच लेखापरीक्षकांनीदेखील उपचारासंबंधी रुग्णांकडून अतिरिक्त बिल आकारणी केली असल्याचे स्पष्ट झाले होते. जिल्हाधिकाऱ्यांनी दिनांक 25 ऑगस्टला या रुग्णालयाला कारणे दाखवा नोटीस बजावली होती. या नोटीसीचा खुलासा रुग्णालयाचे व्यवस्थापक डॉक्टर गिरीश पाकणीकर यांनी केला होता. त्यानंतर 1 सप्टेंबर रोजी यासंदर्भात सुनावणी झाली. या सुनावणीदरम्यान तक्रारदारांनी केलेल्या तक्रारी आणि आणि रुग्णालयाने केलेला खुलासा या दोन्हीमध्ये रुग्णालयाने अतिरिक्त बिल आकारल्याचे स्पष्ट झाले.

हेही वाचा - कंगनाला रणौतला आरपीआय देईल संरक्षण.. रामदास आठवले आले मदतीला

कोरोनाबाधित आठ रुग्णांकडून विवेकानंद रुग्णालयाने 1 लाख 93 हजार 968 रुपये अतिरिक्त वसूल केले असल्याचे आदेशात म्हटले आहे. तसेच वसूल केलेली अतिरिक्त रक्कम मुख्यमंत्री सहायता निधीमध्ये तत्काळ जमा करण्याचे आदेशही या रुग्णालयाला देण्यात आले आहेत. ही रक्कम जमा न केल्यास गुन्हा दाखल करून दंडात्मक कारवाई करण्यात येईल, असा इशाराही देण्यात आला आहे.

ETV Bharat Logo

Copyright © 2024 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.