ETV Bharat / state

ई -चालान येताच वाढले जालना शहर वाहतूक शाखेचे उत्पन्न - Dilip Pohnerkar

जालना वाहतूक पोलीस शाखेकडून वाहतुकीचे नियम तोडणाऱ्या वाहनचालकांवर कारवाई करत ई-चालानद्वारे दंड वसूल केला जात आहे. यामुळे वाहतूक शाखेचे उत्पन्न वाढण्यास मदत झाली आहे.

ई-चालान
author img

By

Published : Jun 24, 2019, 10:17 AM IST

जालना - कायद्याचा भंग केल्यानंतर वाहनधारकांकडून दंड वसूल करताना पोलीस आणि जनता हे दोघेही ही एक दुसऱ्याचे हित जोपासण्याचा प्रयत्न करतात, त्यातून निश्चितच दोघांचाही फायदा करून घेण्याची भाषा वापरली जाते. परंतु आता जालन्यात ई- चालान मशीन आल्यामुळे फक्त पोलीस प्रशासनाचा फायदा होत असून वाहनधारकही वाहतुकीचे नियम पाळण्याचा प्रयत्न करत आहेत. यामुळे पोलिसांच्या डोक्याचा ताण कमी होऊन दंडाची वसुलीही ही वाढली आहे.

माहिती देताना वाहतूक पोलीस निरीक्षक काकडे

जालना शहरात ८, मे २०१९ पासून ई-चालानद्वारे दंड वसूल करण्यास सुरुवात झाली. या मशीनमुळे वाहनधारकांकडून वसूल करण्यात येणारा दंडामध्ये प्रचंड वाढ झाली आहे. त्यासोबतच वाहनधारकांसोबत होणारे वादविवादही संपुष्टात आले आहेत. परंतु आत्तापर्यंत काम करणारे तेच कर्मचारी असताना वसुली कमी का? हा एक सर्वसामान्यांना पडलेला प्रश्न आहे .पोलीस प्रशासनाच्या अधिकृत नोंदणीनुसार दिनांक १ जानेवारी ते ३१ डिसेंबर, २०१७ दरम्यान ११ हजार ८७० वाहनचालकांकडून २६ लाख ३२ हजार ५० रुपये, १ जानेवारी ते ३१ डिसेंबर २०१८ दरम्यान १५ हजार ३८७ वाहनधारकांकडून ३४ लाख ७७ हजार २०० रुपये दंड वसूल करण्यात आला आहे. तर १ जानेवारीपासून २०१९ ते जून २०१९ पर्यंत ९ हजार १९३ वाहनधारकांकडून २० लाख ५५ हजार ४०० रुपये दंड वसूल करण्यात आला आहे. यापैकी मोठी रक्कम ई-चालान मशीनने वसूल झाली आहे. दिनांक ८ मे ते १६ जून या सव्वा महिन्यातच २ हजार ७९१ वाहन चालकांकडून ५ लाख ९६ हजार ३०० एवढी रक्कम वसूल झाली आहे .वाहनधारकांवर होणाऱ्या दंडात्मक कारवाईचा कारवाईची गती अशीच चालू राहिली तर वर्षभरामध्ये हे सुमारे ५३ लाख रुपयांचे उत्पन्न या शहर वाहतूक शाखेला होऊ शकते. जालना शहर वाहतूक शाखेचा पदभार पोलीस निरीक्षक काकडे यांनी दिनांक ७ जून २०१८ रोजी स्वीकारला होता. त्यावेळपासून त्यांच्या कार्यकालात ४१ लाख ६९ हजार एवढा दंड वसूल करण्यात आलेला आहे.

जालना वाहतूक पोलीस शाखेत एकूण ५३ पोलीस कर्मचारी कार्यरत आहेत. शहर वाहतूक शाखेसाठी ४० ई-चालान मशीन आल्या आहेत. त्यापैकी ३० मशीन या जालना शहरात विविध ठिकाणी कार्यरत असलेले शहर वाहतूक शाखेचे पोलीस कर्मचारी वापरत आहेत. एक मशीन उपविभागीय पोलीस अधिकाऱ्यांच्या कार्यालयात आहे. उर्वरित ९ मशीन सदर बाजार, कदीम जालना, चंदनझिरा, परतूर, मंठा, घनसावंगी, अंबड,भोकरदन, आणि बदनापूर, अशा पोलीस ठाण्यात दिलेल्या आहेत. एक मशीन आणि त्यासोबतच्या एक प्रिंटरच्या खरेदीसाठी असा एकूण ३५ हजार रुपये खर्च येतो. जालना शहर वाहतूक शाखेमध्ये पोलीस निरीक्षक काकडे यांच्या नियंत्रणात सहाय्यक पोलीस उपनिरीक्षक सुरेश भाले यांच्यासह अशोक आघाव, भगवान नागरे, मनसुबराव नागवे, दत्ता जाधव, छाया मस्के, नम्रता कांबळे आदि कर्मचारी काम करत आहेत.

का वाढली वसुली ?

कायद्याचा भंग केल्यामुळे वाहनधारकाला पकडण्यात येते त्यावेळी पोलिसांसोबत पावती फाडणे यावरून वाद होतात .कधी कधी देण्याघेण्याच्या प्रयत्नांमध्ये हे वाद मिटविले ही जातात आणि पावती फाडायची राहून जाते. परंतु आता असे वाद घालण्याचे कारण राहिले नाही, कारण एखाद्या वाहनधारकाकडे जर सदरील पावती पाडण्यासाठी पैसे नसतील तर त्या व्यक्तीसोबत वाद न घालता 'अन पेड' म्हणून चालान फाडून देण्यात येते. त्यामुळे हा व्यक्ती महाराष्ट्रात कुठेही दंड भरू शकतो. त्यामुळे पोलिसांसोबत होणारे विनाकारण वाद विवाद टाळले जात आहेत. म्हणून वादविवाद न करता पोलीस कर्मचारी देखील संबंधितांना पावती देत आहेत. प्रवासीदेखील खिशात पैसे नसले तरी पावती खिशात घालून निघून जात आहेत.

पावती पुस्तक होणार बंद

या मशीन इंटरनेटच्या माध्यमातून शहर वाहतूक शाखेशी जोडलेल्या आहेत. त्यामुळे पावती फाटताच तिची नोंद येथील संगणकात होते. म्हणून पुन्हा नोंदी घेण्याचे काम बंद झाले आहे. यामुळे पर्यायाने आता पावतीपुस्तकाची गरज राहिली नाही.

Intro:कायद्याचा भंग केल्यानंतर वाहनधारकांकडून दंड वसूल करताना पोलीस आणि जनता हे दोघेही ही एक दुसऱ्याचे हित जोपासण्याचा प्रयत्न करतात, त्यातून निश्चितच दोघांचाही फायदा करून घेण्याची भाषा वापरली जाते., परंतु आता जालन्यात ई चलन मशीन आल्यामुळे फक्त पोलीस प्रशासनाचा फायदा होत आहे .या मशीनमुळे पोलिसांच्या डोक्यांचा तान कमी होऊन दंडाची रक्कम वसुलीही ही वाढली आहे.

Body:जालना शहरात आठ मे 2019 पासून ई चालन फाडण्यास सुरुवात झाली .या मशीनमुळे वाहनधारकांकडून वसूल करण्यात येणारा दंडामध्ये प्रचंड वाढ झाली आहे .त्याच सोबत वाहनधारकांसोबत होणारे वादविवादही संपुष्टात आले आहेत. परंतु आत्तापर्यंत काम करणारे तेच कर्मचारी असताना वसुली कमी का?हा एक सर्वसामान्यांना पडलेला प्रश्न आहे .पोलीस प्रशासनाच्या अधिकृत नोंदणीनुसार दिनांक 1 जानेवारी ते 17 31 डिसेंबर दरम्यान सतरा च्या दरम्यान अकरा हजार 870 वाहनचालकांकडून 26 लाख 34000 पन्नास रुपये, 1 जानेवारी ते 31 डिसेंबर 2018 पंधरा हजार 387 वाहनधारकांकडून 34 लाख 77 हजार दोनशे रुपये दंड वसूल करण्यात आला, आहे तर एक जानेवारीपासून 16 जून 2019 पर्यंत 9193 वाहनधारकांकडून वीस लाख लाख 55 हजार चारशे रुपये दंड वसूल करण्यात आला आहे यापैकी मोठी रक्कम ई चालन मशीन आल्यापासूनच वसूल झाले आहे .दिनांक आठ मे ते 16जुन या सव्वा महिन्यातच 2791 वाहन चालकांकडून पाच लाख 96 हजार 300 एवढी रक्कम वसूल झाले आहे .वाहनधारकांवर होणाऱ्या दंडात्मक कारवाईचा कारवाईची गती अशीच चालू राहिली तर वर्षभरामध्ये हे सुमारे 53 लाख रुपयांचे उत्पन्न या शहर वाहतूक शाखेला होऊ शकते. जालना शहर वाहतूक शाखेचा पदभार पोलीस निरीक्षक चत्रभुज काकडे यांनी दिनांक सात जून 2018 रोजी स्वीकारला होता त्यावेळपासून त्यांच्या कार्यकालात 41 लाख 69हजार एवढा दंड वसूल करण्यात आलेला आहे.
* शहर वाहतूक शाखेची आजची स्थिती *
पोलीस नाईक पासून पोलीस निरीक्षक असे एकूण 53 कर्मचारी कार्यरत आहेत .
शहर वाहतूक शाखेचे साठी 40 ई चालन मशीन आल्या आहेत. त्यापैकी तीस मशीन या जालना शहरात विविध ठिकाणी कार्यरत असलेले शहर वाहतूक शाखेचे पोलीस कर्मचारी वापरत आहेत.
एक मशीन उपविभागीय पोलिस अधिकाऱ्यांच्या कार्यालयात आहे .आणि उर्वरित नऊ मशीन सदर बाजार , कदीम जालना, चंदनझिरा ,परतूर ,मंठा ,घनसावंगी, अंबड ,भोकरदन, आणि बदनापूर अशा पोलीस ठाण्यात दिलेल्या आहेत . एक मशीन आणि त्यासोबतचे एक प्रिंटर असा एकूण 35 हजार रुपये खर्च एका मशीन ला आलेला आहे.

जालना शहर वाहतूक शाखेमध्ये पोलीस निरीक्षक चत्रभुज काकडे यांच्या नियंत्रणात सहाय्यक पोलीस उपनिरीक्षक सुरेश भाले ,यांच्यासह अशोक आघाव, भगवान नागरे, मनसुबराव नागवे, दत्ता जाधव, छाया मस्के, नम्रता कांबळे, आदि कर्मचारी काम करत आहेत.
*का वाढली वसुली *
कायद्याचा भंग केल्यामुळे वाहनधारकाला पकडण्यात येते त्यावेळी पोलिसांसोबत पावती फाडणे यावरून वाद होतात .कधी कधी देण्याघेण्याच्या प्रयत्नांमध्ये हे वाद मिटविले ही जातात आणि पावती फाडायची राहून जाते. परंतु आता असे वाद घालण्याचे कारण राहिले नाही, कारण एखाद्या वाहनधारकाकडे जर सदरील पावती पाडण्यासाठी पैसे नसतील तर त्या व्यक्तीसोबत वाद न घालता 'अन पेड' म्हणून चलन फाडून देण्यात येते. त्यामुळे हा व्यक्ती महाराष्ट्रात कुठेही ही हा दंड भरू शकतो. त्यामुळे पोलिसांसोबत होणारे विनाकारण वाद विवाद टाळल्या जात आहेत. आणि कदाचित संबंधित वाहनधारकाने जर दंड नाही भरला तर पुढील वेळेस ज्यावेळी हे वाहन पकडले जाईल त्यावेळेस त्याच्या नावावर असलेला मागचा दंडही दिसेल. आणि तो वसूल करण्याची तरतूद कायद्यातआहे .त्यामुळे वाहनाची जन्म कुंडली या मशीन वर दिसत आहे .म्हणून वादविवाद न करता पोलीस कर्मचारी देखील संबंधितांना पावती देत आहेत. आणि प्रवासी देखील खिशात पैसे नसले तरी पावती खिशात घालून निघून जात आहेत.
*पावती पुस्तक होणार बंद*
या मशीन इंटरनेट च्या माध्यमातून शहर वाहतूक शाखेशी जोडलेल्या आहेत, त्यामुळे पावती फाटताच तिची नोंद येथील संगणकात होते, त्यामुळे परत नोंदी घेण्याचे काम बंद झाले आहे.आणि पर्यायाने आता पावतीपुस्तकाची गरज राहिली नाही.

Conclusion:
ETV Bharat Logo

Copyright © 2024 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.