जालना - काका सोबत का भांडण केले? याचा जाब विचारण्यासाठी गेलेल्या आरोपीला जीवे मारण्याचा प्रयत्न केल्याची घटना लालबाग परिसरात घडली. पोलिसांनी चार आरोपींना अटक केली होती तर दोन आरोपी अद्यापही फरार आहेत.
चाकूने मारहाण दोन आरोपी फरार
मोहसिन खान सुलतान खान पठाण (वय 30) यांचे काका अमजद खान राजदर खान पठाण आणि परिसरातील काही जणांचे 11 तारखेला सकाळी भांडण झाले होते. हे भांडण का केले याचा जाब विचारण्यासाठी मोहसीन खान सुलतान खान हे लालबाग परिसरात राहणाऱ्या असेफ खान अलियार खान पठाण (वय 50), तोफिक खान असेफ खान पठाण (वय 21), तालीब खान असेफ खान पठाण (वय 21), शेख फारुख शेख शफिक (वय 19), असेफ खानची पत्नी यांना या मारहाणी विषयी जाब विचारला. त्यावेळी तोफिक याने त्याच्या हातातील लोखंडी चाकूने फिर्यादी मोहसीन खान यांच्या मानेवर वार केले आणि जीवे मारण्याचा प्रयत्न केला. तर असेफच्या पत्नीने तिच्या हातात असलेल्या लाकडी दांड्याने फिर्यादीच्या डोक्यात जबर मारहाण केली आणि फिर्यादी हा खाली पडल्यावर इतरांनी त्याला लाथाबुक्क्यांनी मारहाण करून जीवे मारण्याचा प्रयत्न केला. दरम्यान शेजारीच राहणाऱ्या शेख सोहेल शेख इसाक व इतरांनी मोहसीन खान यांना उचलून सामान्य रुग्णालयात उपचारासाठी पाठविले. त्यांच्यावर सध्या उपचार सुरू आहेत.
हे आहेत सहा आरोपी
आसिफ खान अलियार खान पठाण (50), तोफिक खान आसिफ खान पठाण (20), तालेब खान असे खान पठाण (21), शेख फारुख शेख शफिक (19), शाहरुख खान आणि सहावी आरोपी असेफ खान ची पत्नी, हे सर्व लालबाग येथे राहतात दरम्यान यापैकी शाहरुख खान आणि असेफ खान याची पत्नी फरार आहे. उर्वरित चार जणांना या प्रकरणाचे तपासी अंमलदार गणेश झलवार यांनी 12 तारखेलाच अटक केली होती आणि दिनांक 15 पर्यंत पोलीस कोठडी दिली होती. या आरोपींना पुन्हा न्यायालयात हजर केले असता न्यायालयाने त्यांना न्यायालयीन कोठडी दिली आहे. उर्वरित दोन फरार आरोपींचा शोध पोलीस घेत आहे.