ETV Bharat / state

जालन्यात वृक्ष लागवडीचे उद्दिष्ट पूर्ण करण्यासाठी शासकीय यंत्रणा लागली कामाला

विभागीय आयुक्त सुनील केंद्रेकर यांनी शहरातील विविध विभागांना भेटी देऊन पाहणी केली. त्यांनी वनविभागालाही भेट दिली. यावेळी त्यांनी महाराष्ट्र शासनाच्या 33 कोटी वृक्ष लागवडीच्या उद्दिष्ट पूर्ततेसाठी कामाची गती वाढविण्याच्या सूचना त्यांनी जिल्हाधिकाऱ्यांसह वन विभागाच्या अधिकाऱ्यांना दिल्या.

जिल्हाधिकारी रवींद्र बिनवडे यांनी विविध शासकीय कार्यालयातील विभाग प्रमुखांना बोलावून  जिल्हाधिकारी कार्यालयात बैठक घेतली.
author img

By

Published : Aug 17, 2019, 11:36 AM IST

जालना - महाराष्ट्र शासनाच्या 33 कोटी वृक्ष लागवडीच्या उद्दिष्टापैकी जिल्ह्याला एक कोटी पाच लाख 67 हजार वृक्ष लागवडीचे उद्दिष्ट देण्यात आले आहे. या उद्दिष्टापैकी 50 टक्के वृक्षलागवड आतापर्यंत झाली आहे. याबाबत विभागीय आयुक्त सुनील केंद्रेकर यांनी ८ ऑगस्टला वनविभागाला भेट देऊन उर्वरित उद्दिष्ट पूर्ण करण्याच्या सूचना दिल्या. त्यानुसार शासकीय यंत्रणा गतिमान झाली असून 30 सप्टेंबर पर्यंत हे उद्दिष्ट पूर्ण करण्याच्या तयारीला लागली आहे.

विभागीय आयुक्त सुनील केंद्रेकर यांनी शहरातील विविध विभागांना भेटी देऊन पाहणी केली. त्यांनी वनविभागालाही भेट दिली. जालना जिल्ह्याला देण्यात आलेल्या वृक्षलागवडीच्या उद्दिष्टाची त्यांनी वनविभागाच्या अधिकाऱ्याकडून माहिती घेतली. यावेळी हे उद्दिष्ट पूर्ततेसाठी कामाची गती वाढविण्याच्या सूचना त्यांनी जिल्हाधिकाऱ्यांसह वन विभागाच्या अधिकाऱ्यांना दिल्या.

त्यानुसार आठ ऑगस्टला जिल्हाधिकारी रवींद्र बिनवडे यांनी विविध शासकीय कार्यालयातील विभाग प्रमुखांना बोलावून जिल्हाधिकारी कार्यालयात बैठक घेतली. या बैठकीला जिल्हा परिषदेच्या मुख्य कार्यकारी अधिकारी श्रीमती निमा अरोरा यांच्यासह सहाय्यक वन संरक्षक पुष्पा पवार, पोलीस प्रशासन, तहसील कार्यालय, आरोग्य विभाग, कृषी विभाग, यासह अन्य शासकीय कार्यालयांचे विभाग प्रमुख उपस्थित होते.

30 सप्टेंबरपर्यंत वृक्ष लागवडीचे उद्दिष्ट पूर्ण करण्यासाठी सर्वच शासकीय यंत्रणेने गती वाढवावी, असे आवाहन जिल्हाधिकारी रवींद्र बिनवडे यांनी यावेळी केले. आत्तापर्यंत 50 लाख 24 हजार रोपांची लागवड करण्यात आली असल्याची माहितीही यावेळी देण्यात आली. जिल्ह्याला देण्यात आलेल्या उद्दिष्टापैकी पन्नास टक्के उद्दिष्ट अद्याप पर्यंत पूर्ण झाले असून उर्वरित उद्दिष्ट 30 सप्टेंबरपर्यंत पूर्ण होईल, असा विश्वास सहाय्यक वनसंरक्षक पुष्पा पवार यांनी व्यक्त केला.

Intro:33 कोटी वृक्ष लागवडीच्या महाराष्ट्र शासनाच्या उद्दिष्टापैकी जालना जिल्ह्याला एक कोटी पाच लाख 67 हजार वृक्ष लागवडीचे उद्दिष्ट देण्यात आले आहे. या उद्दिष्टापैकी 50 टक्के वृक्षलागवड आतापर्यंत झाली आहे. याबाबत विभागीय आयुक्त सुनील केंद्रेकर यांनी बुधवार दिनांक आठ रोजी वनविभागाला भेट देऊन उर्वरित उद्दिष्ट पूर्ण करण्याच्या सूचना दिल्या. त्यानुसार शासकीय यंत्रणा गतिमान झाली असून 30 सप्टेंबर पर्यंत हे उद्दिष्ट पूर्ण करण्याच्या तयारीला लागली आहे.

Body:विभागीय आयुक्त सुनील केंद्रेकर यांनी काल शहरातील विविध विभागांना भेटी देऊन पाहणी केली. त्यातीलच एक भाग म्हणजे वनविभाग .जालना जिल्ह्याला देण्यात आलेल्या वृक्षलागवडीच्या उद्दिष्टाची त्यांनी वनविभागाच्या अधिकाऱ्याकडून माहिती घेतली. यावेळी हे उद्दिष्ट पूर्ततेसाठी कामाची गती वाढविण्याच्या सूचना त्यांनी जिल्हाधिकाऱ्यांसह वन विभागाच्या अधिकाऱ्यांना दिल्या .त्यानुसार आज गुरुवार दिनांक आठ रोजी जिल्हाधिकारी रवींद्र बिनवडे यांनी विविध शासकीय कार्यालयातील विभाग प्रमुखांना बोलावून आज जिल्हाधिकारी कार्यालयात बैठक घेतली. या बैठकीला जिल्हा परिषदेच्या मुख्य कार्यकारी अधिकारी श्रीमती निमा अरोरा यांच्यासह सहाय्यक वन संरक्षक पुष्पा पवार, पोलीस प्रशासन, तहसील कार्यालय,आरोग्य विभाग, कृषी विभाग, यासह सह अन्य शासकीय कार्यालयांचे विभाग प्रमुख उपस्थित होते. 30 सप्टेंबर पर्यंत वृक्ष लागवडीचे उद्दिष्ट पूर्ण करण्यासाठी सर्वच शासकीय यंत्रणेने गती वाढवावी असे आवाहन जिल्हाधिकारी रवींद्र बिनवडे यांनी यावेळी केले. आत्तापर्यंत 50 लाख 24 हजार रोपांची लागवड करण्यात आली असल्याची माहितीही यावेळी देण्यात आली. जिल्ह्याला देण्यात आलेल्या उद्दिष्टापैकी पन्नास टक्के उद्दिष्ट अद्याप पर्यंत पूर्ण झाले असून उर्वरित उद्दिष्ट 30 सप्टेंबरपर्यंत पूर्ण होईल असा विश्वास सहाय्यक वनसंरक्षक पुष्पा पवार यांनी व्यक्त केला.

Conclusion:
ETV Bharat Logo

Copyright © 2024 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.