जालना - कोरोना विषाणूंचा प्रादुर्भाव झाल्यापासून जागोजागी सॅनिटायझरची गरज भासू लागली आहे. ही गरज लक्षात घेऊन जालन्यातील सातवीत शिकणाऱ्या एका विद्यार्थ्यांने स्वयंचलित सॅनिटायझर यंत्र तयार केले आहे. याच्या माध्यमातून यंत्राला हात न लावता सॅनिटायझर घेता येते. वरुण राजकुमार गौड असे त्या विद्यार्थ्याचे नाव असून तो राष्ट्रीय हिंदी विद्यालयात शिकतो. त्याने सबमर्सिबल मोटर आणि टायमिंग सेन्सर्सचा उपयोग करून हे यंत्र बनवले आहे.
कोरोनाच्या पार्श्वभूमीवर लॉकडाऊन सुरू आहे. या काळात घराबाहेर बाहेर पडू नका, सारखे मास्क बांधा, वारंवार हात स्वच्छ धुवा, सॅनिटायझर वापरा, असे शासन निवेदनातून, जाहिरातीतून जनजागृती करत आहे.
स्वयंचलित सॅनिटायझर यंत्र तयार करण्यासाठी 360 रुपये इतका खर्च आल्याचे वरुण याने सांगितले. त्याने बॅटरी, एक सेंसर, एक एलईडी, मोस पेट, सबमर्सिबल पंप, स्वीच याचा वापर करत हे यंत्र तयार केले आहे.
सॅनिटायझर हवे असल्यास त्या यंत्रासमोर हात पुढे केल्यानंतर सेंसर अॅक्टिव्ह होऊन सॅनिटायझर आपोआप त्या साठवलेल्या बाटलीतून बाहेर येतो. या यंत्राचा वापर जर सर्वांनी केला तर कोरोनाचा प्रसार थांबेल, असा विश्वास वरुण याचा आहे.
हेही वाचा - वालसावंगी शिवारात लांडग्याच्या हल्ल्यात ११ शेळ्या ठार; शेतकऱ्यांमध्ये भीतीचे वातावरण
हेही वाचा - जालना : सोयाबीनच्या उगवण क्षमतेबद्दल शेतकऱ्यांना प्रशिक्षण, कृषी अधिकाऱ्यांकडून मार्गदर्शन