जालना - 21 जून हा वर्षातील सर्वात मोठा दिवस आहे. या दिनाचे औचित्य साधून पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या प्रेरणेतून आणि त्यांनी केलेल्या आवाहनानुसार 2015 या वर्षापासून जगभरात 21 जून हा जागतिक योग दिवस म्हणून साजरा केला जातो. जालना शहरात यंदाच्या योगा दिनाची पूर्वतयारी गेल्या पाच दिवसांपासून ज्वाला लॉन्स येथे सुरू आहे. सोमवारी 21 जूनला मान्यवरांच्या उपस्थितीमध्ये हा योग दिवस उत्साहाने साजरा करण्यात येणार आहे. त्याबाबत ईटीव्ही भारतने घेतलेला हा विशेष आढावा
जागतिक योग दिन : शरीर आणि मन तंदुरुस्त ठेवण्याचे प्रभावी साधन म्हणजे योगासने - international yoga day
27 सप्टेंबर 2014 मध्ये पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी संयुक्त राष्ट्राच्या महासभेत भाषण केले आणि या भाषणादरम्यान वर्षातील सर्वात मोठा दिवस असलेला 21 जून हा जागतिक योगा दिन म्हणून साजरा करावा असे आवाहन केले होते. त्यांच्या या प्रस्तावाला संयुक्त राष्ट्राच्या महासभेने सकारात्मक प्रतिसाद देऊन 2015 पासून 21 जून हा योगा दिन म्हणून साजरा करण्यास मान्यता दिलीआहे.