ETV Bharat / state

आता सामान्य रुग्णालयातही चौकशी कक्ष; सीईओकडून पाहणी - Jalna General Hospital news

कोरोनाचे वाढते रुग्ण लक्षात घेता सामान्य रुग्णालयात गर्दी वाढत आहे. मात्र, अशा या गर्दीत आलेल्या सामान्य नागरिकांना योग्य मार्गदर्शन व्हावे, या हेतूने जालन्यातील सामान्य रुग्णालयात चौकशी कक्ष सुरू करण्यात आला आहे.

Inquiry department started at Jalna General Hospital
आता सामान्य रुग्णालयातही चौकशी कक्ष
author img

By

Published : May 18, 2020, 6:37 PM IST

जालना - कोरोनाचे वाढते रुग्ण लक्षात घेता सामान्य रुग्णालयात गर्दी वाढत आहे. मात्र, अशा या गर्दीत आलेल्या सामान्य नागरिकांना योग्य मार्गदर्शन व्हावे, या हेतूने सामान्य रुग्णालयात चौकशी कक्ष सुरू करण्यात आला आहे. या चौकशी कक्षाची जिल्हा परिषदेच्या मुख्य कार्यकारी अधिकारी निमा अरोरा यांनी आज पाहणी केली.

आता सामान्य रुग्णालयातही चौकशी कक्ष
सामान्य रुग्णालयाच्या प्रवेशद्वारावरच आता रुग्णांना कोणत्या विभागात जायचे आणि कोणता विभागांत कोणत्या रुग्णांसाठी व्यवस्था आहे, याची माहिती मिळणार आहे. यामुळे रुग्णालयातील गर्दी कमी होईल आणि योग्य मार्गदर्शन मिळेल, असा विश्वास प्रशासनाला वाटत आहे. त्याचाच एक भाग म्हणून सामान्य रुग्णालयाच्या प्रवेशद्वारावरच चौकशी कक्षाचे बांधकाम सुरू आहे. या बांधकामाला वेळ असल्यामुळे सध्या तंबू टाकून चौकशी कक्षाचे काम सुरू झाले आहे. आज पहिल्याच दिवशी जालना जिल्हा परिषदेच्या मुख्य कार्यकारी अधिकारी निमा अरोरा आणि राष्ट्रीय ग्रामीण आरोग्य मिशनचे व्यवस्थापक शेळके यांनी पाहणी केली. यादरम्यान माया सुतार, विद्या मस्के, सुनंदा कोरडे यांची उपस्थिती होती. येथे कर्मचाऱ्यांना 4 तास इथे आणि 4 तास आपले रोजचे काम करायचे आहे. त्यामुळे नाराजी पसरल्याचे दिसून आले आहे.
आता सामान्य रुग्णालयातही चौकशी कक्ष; सीईओकडून पाहणी

ETV Bharat Logo

Copyright © 2025 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.