ETV Bharat / state

कीर्तनकार इंदुरीकर महाराज यांच्या गाडीचा जालन्यात अपघात; कोणतीही इजा नाही - Indorikar Maharaj car accident

किर्तनकार निवृत्ती महाराज देशमुख इंदोरीकर यांच्या चारचाकी वाहनाला जालन्यातील परतूर शहरातील साईनाथ कॉर्नरवर किरकोळ अपघात झाल्याची घटना बुधवारी रात्री साडे आठ वाजेच्या सुमारास घडली आहे. परतूर तालुक्यातील खांडवीवाडी येथे कीर्तनासाठी जात असतांना साईनाथ कॉर्नरवरील हॉटेल मधूबन समोर रस्त्याक्रॉस करणाऱ्या एका ट्रॅक्टरवर आदळून हा अपघात झाला.

इंदुरीकर महाराज यांच्या गाडीला जालन्यात अपघात

author img

By

Published : Apr 14, 2022, 7:56 AM IST

जालना - सुप्रसिद्ध किर्तनकार निवृत्ती महाराज देशमुख इंदोरीकर यांच्या चारचाकी वाहनाला जालन्यातील परतूर शहरातील साईनाथ कॉर्नरवर किरकोळ अपघात झाल्याची घटना बुधवारी रात्री साडे आठ वाजेच्या सुमारास घडली आहे. परतूर तालुक्यातील खांडवीवाडी येथे कीर्तनासाठी जात असतांना साईनाथ कॉर्नरवरील हॉटेल मधूबन समोर रस्त्याक्रॉस करणाऱ्या एका ट्रॅक्टरवर आदळून हा अपघात झाला. एमएच १२ टीवाय १७४४ या क्रमांकाच्या काळ्या रंगाच्या स्कॉर्पिओने ते प्रवास करत होते. या अपघात इंदोरीकर महाराजांना कोणतीही इजा झाली नसून गाडीचा चालक संजय गायकवाड किरकोळ जखमी झाला आहे.

अपघाताची माहिती मिळताच परतुरचे पोलीस निरीक्षक शामसुंदर कौठाळे यांच्यासह पोलीस कर्मचारी घटनास्थळावर दाखल झाले. जखमी चालकाला पोलिसांच्या मदतीने शहरातील खाजगी हॉस्पिटलमध्ये दाखल करण्यात आले असल्याची माहिती पोलिसांनी दिली. अपघात स्थळावरून इंदोरीकर महाराज यांना दुसऱ्या वाहनाने खांडवीवाडी येथे पोचवण्यात आले. या ठिकाणी त्यांचे किर्तन नियोजित वेळेत पार पडले. दरम्यान अपघाताची माहिती मिळताच शहरातील नागरीकांनी घटनास्थळी मोठी गर्दी केली होती.

ETV Bharat Logo

Copyright © 2025 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.