ETV Bharat / state

बदनापुरात अवैध वाळू वाहतूक करणारे तीन ट्रक पकडले; जिल्हाधिकाऱ्यांच्या पथकाची कारवाई - illegal sand trucks seized in jalna

अवैध वाळू वाहतूकीसंबंधी गोपनीय माहिती जिल्हाधिकाऱयांनी नेमलेल्या विशेष पथकाला मिळली. संबंधित माहितीची दखल घेत पथकाने सोमठाणा रस्त्यावर तीन मोठ्या ट्रकवर कारवाई केली.

illegal sand trucks seized in jalna
जिल्हाधिकाऱयांनी नेमलेल्या विशेषपथकाने सोमठाणा रस्त्यावर तीन मोठ्या ट्रकवर कारवाई केली.
author img

By

Published : Nov 29, 2019, 8:41 PM IST

जालना - बदनापूर तालुक्यात पोलीस व महसूल प्रशासनाच्या हलगर्जी कारभारामुळे वाळू माफियांनी धुमाकूळ घातला असून उगडपणे अवैधरित्या वाळू वाहतूक करण्यात येत आहे. यासंबंधी गोपनीय माहिती जिल्हाधिकाऱ्यांनी नेमलेल्या विशेष पथकाला मिळली. संबंधित माहितीची दखल घेत पथकाने सोमठाणा रस्त्यावर तीन मोठे ट्रकवर कारवाई केली. यानंतर हे हायवा ट्रक तहसीलदार कार्यालयाच्या आवारात आणण्यात आले. विशेष पथकाने अचानक केलेल्या या कारवाईमुळे वाळू माफियांचे धाबे दणाणले आहेत.

illegal sand trucks seized in jalna
जिल्हाधिकाऱयांनी नेमलेल्या विशेषपथकाने सोमठाणा रस्त्यावर तीन मोठ्या ट्रकवर कारवाई केली.

बदनापूर तालुक्यात मागील काही वर्षांपासून राजरोसपणे वाळू माफिया उपसा करत असून तालुक्यातील सोमठाणा, रोषणगाव, आदी भागात अवैध वाळू विक्री करण्यात येते. नागरिकांनी तक्रार केल्यानंतर त्यांना धमकावल्याचे प्रकारही समोर आले आहेत. या संदर्भात जिल्हाधिकारी कार्यालयात देखील तक्रार करण्यात आली आहे. बदनापूर तालुक्यात पोलीस व महसूल प्रशासनाच्या सहकार्याने अवैध वाळू उपसा व विक्री सुरू असल्याची माहिती जिल्हाधिकाऱयांना मिळाली. यानंतर त्यांनी माफियांवीरोधात कारवाईसाठी विशेष पथकाची नियुक्ती केली.

illegal sand trucks seized in jalna
जिल्हाधिकाऱयांनी नेमलेल्या विशेषपथकाने सोमठाणा रस्त्यावर तीन मोठ्या ट्रकवर कारवाई केली.

संबंधित वाळू विक्री प्रकरणाबद्दल 29 नोव्हेंबरला पथकातील साबळे, डोईफोळे, मोरे, तसेच पोलीस कर्मचारी अजय राजपूत, संतोष अंभोरे यांना माहिती मिळाली. यानंतर तीन हायवा (क्रमांक एमएच 20 ईझेड 5273, एमएच 21 बीएच 7009, एमएच 21बीएच 7000) ताब्यात घेण्यात आल्या.

Intro:बदनापूर/प्रतिनिधी

बदनापूर तालुक्यात पोलीस व महसूल प्रशासनाच्या आशीर्वादाने वाळू माफियांनी धुमाकूळ घातलेला असून राजरोसपणे अवैधरित्या वाळू वाहतूक केली जात असल्याची गोपनीय माहिती जिल्हाधिकार्यानी नेमलेल्या विशेष पथकाला मिळताच सोमठाणा रस्त्यावर पथकाने नजर ठेवत तीन हायवा धरले व तहसील कार्यालयाच्या आवारात लावण्यात आले,अचानक पथकाने कारवाई केल्याने वाळू माफियांचे धाबे दणाणले आहे

    बदनापूर तालुक्यात मागील काही वर्षांपासून राजरोसपणे वाळू माफियांनी धुमाकूळ सुरू केलेला असून बदनापूर व इतर तालुक्यातून अवैधरित्या वाळू उपसा करून हायवा,टॅक्टर आदी वाहनाद्वारे वाहतूक केली जाते,तालुक्यातील सोमठाणा,रोषणगाव आदी भागात अवैध वाळू विक्री केली जात असल्याने काही पोलीस व काही महसूल कर्मचारी केवळ या वाहनधारक मंडळी कडून ठराविक रक्कम जमा करण्यात मग्न असतात ,नागरिकांनी तक्रार केल्यास तक्रारकर्त्यास धमकवण्याचे कार्य काही पोलीस व महसूल कर्मचारी करतात या संदर्भात जिल्हाधिजारी कार्यालयात देखील तक्रार करण्यात आलेली आहे 

    बदनापूर तालुक्यात पोलीस व महसुल प्रशासनाच्या सहकार्याने अवैध वाळू विक्री व उपसा सुरू असल्याची माहिती जिल्हाधिकाऱयांना मिळाल्यानंतर जिल्हाधिकार्यानी वाळू माफिया विरुद्ध कारवाई करण्यासाठी विशेष पथकाची नियुक्ती केलेली असून तालुक्यातील सोमठाणा मार्गावर अवैध वाळू वाहतूक केली जात असल्याची माहिती विशेष पथकाला मिळाली असता 29 नोव्हेंबर रोजी पथकाचे साबळे,डोईफोळे,मोरे,पोलीस कर्मचारी अजय राजपूत,संतोष अंभोरे व तहसील कार्यालयातील कर्मचार्यानी सोमठाणा मार्गावर तीन हायवा (क्रमांक एमएच 20 ईझेड 5273, एमएच 21 बीएच 7009 व एमएच 21बीएच 7000) पकडून ताब्यात घेतले व तहसील कार्यालयाच्या आवारात लावण्यात आले आहे ,यापूर्वी काही पोलीस कर्मचार्यानी अवैध रित्या वाहतूक करणारे वाहने पकडून सोडून दिल्याचा घटना घडलेल्या आहेत मात्र आजच्या कारवाई ने वाळू माफियांचे धाबे दणाणले आहे. दरम्यान जालनाचे पथक बदनापूर येथे कारवाई करत असल्याचे चित्र असताना स्थानिक महसूल व पोलीस प्रशासन या अवैध वाळू वाहतूकीकडे का दुर्लक्ष करत होते या बाबत नागरिकांत चर्चा आहे.Body:तहसील कार्यालयात लावलेली वाहनेConclusion:
ETV Bharat Logo

Copyright © 2024 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.