भोकरदन ( जालना ) : नात्याला काळिमा फासणारी घटना समोर आली आहे. भोकदरन तालुक्यातील कोठारा येथे दिराने वहिनीवर ( husbands brother rape Woma ) बलात्कार केला. ही घटना रविवारी रात्री घडली. हा प्रकार ( Jalna crime news ) सोमवारी उघडकीस आला.
पीडितेने दिलेल्या तक्रारीवरून भोकरदन पोलीस ठाण्यात ( Bhokardan Police news ) गुन्हा दाखल करण्यात आला आहे. आरोपी दिराविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला आहे. त्याला अटक करण्यात आली आहे.
पीडितेचा पती हरविलेला आहे : विशेष म्हणजे पीडितेचा पती हा हरवलेला आहे. तिचा पती हरवल्याची मीसिंग तक्रार भोकरदन पोलीस ठाण्यात दाखल करण्यात आलेली आहे. पीडित महिलेचा पती हरवलेला असल्याने पीडितेचा दिर आरोपी गोपाल दांडगे व त्याची मुलगी हे दररोज तिला सोबत म्हणून संध्याकाळी झोपण्यासाठी तिच्याकडे येत होते. आश्रय म्हणून झोपण्यासाठी येणाऱ्या दिराची मात्र नियत खराब झाली. रविवारी मध्यरात्रीच्या सुमारास पीडित महिलेच्या दिराने तिच्यावर बलात्कार केला.
आरोपीला अटक : धक्क्याने भेदरलेल्या पीडित महिलेच्या तक्रारीवरून गोपाल दांडगे वय २६ वर्ष, दिराविरोधात बलात्काराचा गुन्हा दाखल करण्यात आला आहे. घटनेची माहिती मिळाल्यानंतर भोकरदन पोलीस ठाण्याचे पोलीस निरीक्षक रत्नदीप जोगदंड, पोलीस निरिक्षक कुटुंबरे व त्यांच्या पथकाने तातडीने चक्रे फिरवत आरोपी दिराच्या मुसक्या आवळल्या आहेत.
नुकतेच विरारमध्ये बलात्काराची घटना विरारच्या अर्नाळा येथील लॉजमध्ये ( Rape lodge in Virar Arnala ) 15 वर्षीय अल्पवयीन तरुणीला तब्बल १७ दिवस डांबून तिच्यावर तिच्यावर बलात्कार ( Minor Girl Raped ) केल्याची नुकतेच धक्कादायक घटना उघडकीस आली आहे. अनैतिक मानवी वाहतूक प्रतिबंधक शाखेने या मुलीची सुटका करून तिच्यावर बलात्कार करणार्या तिघांना अटक ( Three rapists arrested ) केली आहे.