ETV Bharat / state

Jalna Crime: नवरा बायकोच्या भांडणात चिमुरडीचा गेला जीव; बापाने पाजले विष

author img

By

Published : May 11, 2023, 10:41 PM IST

जालना जिल्ह्यातून एक धक्कदायक घटना समोर आली आहे. पती-पत्नीच्या भांडणात रागातून कृष्णा पंडित यांने आपल्या चिमुकलीला विष दिले. त्यानंतर स्वत:ही विष प्राशन करून आत्महत्या करण्याचा प्रयत्न केला. मात्र बाप वाचला अन् मुलगी गेली.

Jalna Crime
चिमुकलीला पाजले विष

जालना: जिल्ह्याच्या अंबड तालुक्यातील कृष्णा पंडित हा अंबड शहरात कॉम्प्युटर ऑपरेटरचा व्यवसाय करतो. तर त्यांची पत्नी मनीषा पंडित एका खासगी बँकेत कर्मचारी म्हणून कार्यरत कार्यरत आहे. दोघांमध्ये नेहमीच वाद होत होते. भाडंणाचे रूपांतर हाणामारीत झाले आणि संतापलेल्या कृष्णा पंडित यांने पत्नी मनीषा हिला मारहाण करत तिच्या डोक्यावर विट फेकून मारली. मनीषाच्या डोक्यातून रक्त निघू लागल्याने तिने खाजगी रुग्णालय गाठले. विटेचा जोरदार फटका बसल्याने तिच्या डोक्यात सहा टाके पडले. शहागड येथील एका खाजगी रुग्णालयात तिने उपचार घेतले.

उंदीर मारण्याचे औषध दिले: मंगळवारी सकाळी दहा वाजेच्या सुमारास, कृष्णा पंडित त्याच्या मुली चिऊ उर्फ श्रेया आणि शिवाज्ञा या दोन्ही मुलींना शहागड येथील पैठण फाटयावरील पाहुण्याच्या वीट भट्टीवर घेऊन गेले. त्याने उंदीर मारण्याचे औषध स्वतः पिले आणि दोन्ही मुलींना देखील पाजून आत्महत्या करण्याचा प्रयत्न केला. थोड्या वेळाने तिघेही उलट्या करून बेशुद्ध झाल्याचे नातेवाईकांनी त्यांना तात्काळ प्रथम गेवराई व नतंर बीड येथील उपजिल्हा रुग्णालयात दाखल केले. बुधवारी कृष्णा पंडित याची तब्येत बरी झाली. परंतु मुलींच्या तब्येतीत सुधारणा झालीच नाही.अखेर गुरुवारी सकाळी मोठी मुलगी श्रेयाची जीव गेला. तर दुसरी मुलगी शिवाज्ञा हिची तब्येत अजून गंभीर असल्याचे समजते.

पती-पत्नीच्या भांडणात मुलीचा बळी: बीड येथील उपजिल्हा रुग्णालयात मृत मुलीचा मृतदेह शवविच्छेदन होऊन नातेवाईकाच्या ताब्यात देण्यात येणार आहे. पती-पत्नीच्या भांडणात मुलीचा बळी गेल्याने शहागड परिसरात हळहळ व्यक्त करण्यात येत आहे. पत्नीच्या चारित्र्यावर संशय घेऊन पतीने भांडत असल्याचे, दिलेल्या तक्रारीत पत्नीने म्हटले आहे. मनीषा पंडित हिच्या जबाबवरून पती कृष्णा पंडित यांच्यावर गोंदी पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

हेही वाचा -

  1. Two Murders In Jalna जालना जिल्ह्यात एकाच दिवसात दोन खून दोन्ही घटनेतील आरोपी अटकेपार
  2. Jalna Crime झोपेतच असताना तरुणाचा खून पोलीस अधीक्षकांच्या निवासस्थानाजवळची घटना
  3. Sexual Abuse Of Minor Girl अल्पवयीन मुलीवर लौंगिक आत्याचार मुलगी राहिली गर्भवती

ETV Bharat Logo

Copyright © 2024 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.