मुंबई: आज विधानसभा अध्यक्ष पदाच्या निवडणुकीकडे सर्वांचे लक्ष लागले होते. विशेष करून शिवसेना बंडखोर नेते मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या गटाकडून भाजपचे उमेदवार राहुल नार्वेकर यांना मतदान करण्यासाठी प्रतोद, भरत गोगावले यांनी व्हीप जारी केला. तर दुसरीकडे उध्दव ठाकरे यांच्या शिवसेनेकडून प्रतोद सुनील प्रभू यांनी ही त्यांचे उमेदवार राजन साळवी यांना मतदान करण्यासाठी व्हीप जारी केल्याने निवडणुकीत रंगत वाढली. शिवसेनेचा व्हिप झुगारून शिंदे गटाने थेट भाजपाच्या राहुल नार्वेकरांना मतदान केले. यावेळी काँग्रेसचे जालन्याचे आमदार कैलास गोरंटयाल यांनी शायरीतून शिंदे गटाला टोला लगावला.
राज्यात गेल्या काही दिवसात अनेत अभूतपूर्व गोष्टी घडल्या. आज राज्याच्या विधिमंडळात विधानसभा अध्यक्षपदाची निवडणूक पार पडली. त्यासाठी सर्वच पक्षांनी व्हिप (पक्षादेश) जारी केला होते. या निवडणुकीसाठी शिवसेनेच्या सर्व आमदारांनी महाविकास आघाडीचे अध्यक्षपदाचे उमेदवार राजन साळवी यांना मतदान करावे असा पक्षादेश जारी केला होता. पण शिवसेनेच्या बंडखोर गटाने हा आदेश धुडकावून लावत राहुल नार्वेकर यांना मतदान केले. आवाजी मतदानाने निर्णय घेता न आल्याने शिरगणती झाली. यावेळी जालनाचे काँग्रेसचे आमदार कैलास किसन गोरंटयाल यांनी शायरी म्हणत शिंदे गटाला टोला लगावला. ते म्हणाले की, "ऐसे वैसे कैसे कैसे हो गये, कैसे कैसे ऐसे वैसे हो गये"
हेही वाचा : Ajit Pawar Statement :...तर शिंदेंना मुख्यमंत्री करायला मीच सांगितलं असतं; अजित पवारांची विधानसभेत फटकेबाजी