जालना - भोकरदन तालुक्यात गेल्या तीन दिवसांपासून वादळी वाऱ्यासह पाऊस आणि गारपीट होत आहे. सततच्या या वादळी वाऱ्यामुळे आणि पावसबारीमुळे तालुक्यातील शेतकरी हैराण झाला आहे. अवकाळी पावसामुळे शेतातील गहू, ज्वारी, मका आदी पिकांचे पिकांचे मोठे नुकसान होत आहे.
हेही वाचा... राज्यातील शेतकऱ्यांकडून दररोज 10 लाख लिटर दुधाची खरेदी
भोकरदन तालुक्यातील रजाळा या गावात सोमवारी जोरदार वादळामुळे एका घरावर झाड कोसळले आहे. सुदैवाने या अपघातात कोणतीही जीवितहानी झालेली नाही. मात्र, घराचे मोठे नुकसान झाले आहे. घरातील सर्व सदस्य शेतामध्ये काम करण्यासाठी गेले होते. तर, मुले बाहेर खेळत होती. वादळ आणी पाऊस सुरू होण्यापूर्वी जवळच्या नागरिकांनी या मुलांना आपल्या घरी बोलावले होते. त्यामुळे जीवितहानी टळली. एकीकडे देशात, राज्यात कोरोनाची दहशत आणि दुसरीकडे तालुक्यात वादळी वारा अन् पाऊस यामुळे नागरिक हैराण झाले आहेत. दुसरीकडे शेतकरी राजा या अस्मानी संकटाने भयभीत झाला आहे.