ETV Bharat / state

जालन्यात पावसाचा हाहाकार; झेंडू फूल विक्रेत्यांंना फटका - Jalna Farmer merygold Flower bussiness Loss

शहरात आज दुपारी चार वाजेच्या सुमारास जोरदार पावसाने हजेरी लावली. या पावसामुळे शेतकऱ्यांनी बाजारामध्ये आणलेली झेंडूची फुले वाहून गेली. जी फुले राहिली ती देखील पाण्याने सडून गेली. पावसामुळे शेतकऱ्यांची हाती असलेले पिक देखील गेले आहे.

जालन्यात पावसाचा हाहाकार
author img

By

Published : Oct 26, 2019, 9:43 PM IST

जालना- शहरात आज दुपारी चार वाजेच्या सुमारास पावसाने जोरदार हजेरी लावली. या पावसामुळे शेतकऱ्यांनी बाजारामध्ये आणलेली झेंडूची फुले वाहून गेली. जी फुले राहिली ती देखील पाण्याने सडून गेली. पावसामुळे शेतकऱ्यांची हाती असलेले पीक देखील गेले आहे. त्यामुळे शेतकऱ्यांना मोठे नुकसान झाले आहे.

जालन्यात पावसाचा हाहाकार

गेल्या दहा दिवसांपासून शहरात पावसाचा जोर कायम आहे. पावसामुळे शहरासह ग्रामीण भागातील पिण्याचा पाण्याचा प्रश्न जरी सुटला असला तरी, कापूस आणि सोयाबीन ही दोन्ही पिकांना पावसाचा फटका बसला आहे. जिल्ह्यात आठ दिवसापूर्वी चांगला पाऊस पडला. त्यामुळे झेंडूच्या फुलांचे चांगले उत्पादन झाले होते. तसेच, लक्ष्मीपूजनासाठी झेंडूच्या फुलांना मान आहे. दुकाने सजवण्यासाठी, घरांना सजवण्यासाठी नागरिक आणि व्यापाऱ्यांकडून मोठ्या प्रमाणात झेंडूच्या फुलांची खरेदी केली जाते. यातून शेतकऱ्यांना आर्थिक फायदा मिळतो.

मात्र, आज झालेल्या जोरदार पावसामुळे शेतकऱ्यांचा फूल मालाला जबर नुकसान झाले आहे. पावसामुळे रस्त्यावर मांडलेली दुकाने वाहून गेलीत. उघड्यावर मांडलेली फुले पावसाच्या पाण्याने सडून गेलीत. त्यामुळे ग्राहकांनी देखील ओल्या फुलांकडे पाठ फिरविली आहे. एकंदरीत यामुळे शेतकऱ्यांचे प्रचंड नुकसान झाले आहे.

हेही वाचा- जालन्यात परतीच्या पावसाचे थैमान; मका, कापूस पिकांचे नुकसान

Intro:जालना शहर व परिसरात जोरदार पाऊस झेंडूच्या फुलांचे झाले नुकसान
जालना आज शनिवारी दुपारी चार वाजेच्या सुमारास जालना शहर व परिसरात जोरदार पाऊस झाला .या पावसामुळे शेतकऱ्यांनी बाजारामध्ये आणलेली झेंडूची फुले वाहून गेली. आणि जी फुले राहिली ती फुले पाण्यानी सडून गेली ,हाती आलेले पीक पावसामुळे वाया गेले आहे .गेल्या दहा दिवसांपासून जालना शहर व परिसरात पावसाचा जोर कायम आहे .या पावसामुळे जालना शहरासह ग्रामीण भागातील पिण्याचा पाण्याचा प्रश्न जरी सुटला असला तरी, कापूस आणि सोयाबीन ही दोन्ही पिके हाताची गेली आहेत. मात्र आठ दिवसांपूर्वी पडलेल्या चांगल्या पावसामुळे झेंडूचे उत्पादन चांगले आले होते. आणि उद्या लक्ष्मीपूजनासाठी झेंडूच्या फुलांचा मान आहे .त्यामुळे व्यापारी वर्ग दुकाने सजवण्यासाठी, नागरिक घरांना सजवण्यासाठी मोठ्या प्रमाणात झेंडूची खरेदी करतात. यामधून शेतकऱ्यांना पैसा मिळतो मात्र आज चार वाजता झालेल्या जोरदार पावसाने शेतकऱ्यांनी रस्त्यावर मांडलेली दुकाने वाहून गेली ,आणि रस्त्यावर उघड्यावर मांडलेल्या या दुकानातील फुलांवर पावसाच्या जोरदार थेंबा मुळे फुले आहेत आणि सडून जात असल्यामुळे ग्राहकांनी देखील ओल्या फुलांकडे पाठ फिरविली आहे .एकंदरीत शेतकऱ्यांचे प्रचंड नुकसान झाले आहे.Body:VisConclusion:
ETV Bharat Logo

Copyright © 2025 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.