ETV Bharat / state

जालना सामान्य रुग्णालयाबाहेर कामगारांची गर्दी; सोशल डिस्टन्सिंगचे तीन तेरा - जालना

नागरिकांकडून सोशल डिस्टन्सिंगचे नियम पाळून घेण्यासाठी महिला पोलीस कर्मचारी परिसरात उपस्थित होत्या. मात्र, त्या मोबाईल चाळताना आणि सहपोलीस कर्मचाऱ्यांशी गप्पा गोष्टी करताना दिसून आल्यात. त्यांच्या हलगर्जीपणामुळे कोरोनाचे संक्रमण वाढण्याची शक्यता नकारता येत नाही.

jalna general hospital crowd
जालना सामान्य रुग्णालयाबाहेर कामगारांची गर्दी
author img

By

Published : May 8, 2020, 8:54 PM IST

जालना - परराज्यातील कामगारांना परत त्यांच्या गावी जाण्यासाठी जिल्हा सामान्य रुग्णालयातून देण्यात येणाऱ्या प्रमाणपत्राची अट घालण्यात आली आहे. या प्रमाणपत्रासाठी जिल्हा सामान्य रुग्णालयातील बाह्यरुग्ण विभागाबाहेर फी भरावी लागते. त्यानंतर निवासी शल्यचिकित्सक प्रमाणपत्र देतात. त्यामुळे, बाह्यरुग्ण विभागाबाहेर प्रचंड गर्दी जमते. मात्र, आरोग्य प्रमाणपत्र मिळवताना कामगारांकडून सोशल डिस्टन्सिंगचा फज्जा उडताना दिसून आला आहे आणि या सर्व प्रकाराकडे पोलिसांकडून दुर्लक्ष होत असल्याचे दिसून येत आहे.

माहिती देताना 'ईटीव्ही भारत' प्रतिनिधी

परराज्यात जाणाऱ्या कामगारांची संख्या लक्षणीय आहे. त्यामुळे, कामगारांनी आज पहाटे सहा वाजल्यापासूनच जिल्हा सामान्य रुग्णालयाच्या बाह्यरुग्ण विभागासमोर गर्दी केली. यावेळी सोशल डिस्टन्सिंगचे पालन होताना दिसून आले नाही. या वेळी नागरिकांकडून सोशल डिस्टन्सिंगचे नियम पाळून घेण्यासाठी महिला पोलीस कर्मचारी परिसरात उपस्थित होत्या. मात्र, त्या मोबाईल चाळताना आणि सहपोलीस कर्मचाऱ्यांशी गप्पा गोष्टी करताना दिसून आल्यात. त्यांच्या हलगर्जीपणामुळे कोरोनाचे संक्रमण वाढण्याची शक्यता नकारता येत नाही. दरम्यान, या प्रकारामुळे सामान्य नागरिकांकडून संताप व्यक्त होत आहे. परराज्यातील हे कामगार जरी जालना सोडून गेले, तरी पाठीमागे त्यांनी कोरोनाला सोडू नये, एवढीच सामान्यांची अपेक्षा आहे.

हेही वाचा- औरंगाबाद अपघात: मजुरांबाबत माहिती देण्यास कंपनीची टाळाटाळ...

ETV Bharat Logo

Copyright © 2024 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.