जालना - शाळांबाबत बुधवारच्या कॅबिनेटमध्ये चर्चा होणार असल्याची माहिती आरोग्य मंत्री राजेश टोपे ( Health Minister Rajesh Tope ) यांनी माहिती दिली आहेत. शाळा सुरू करण्याबाबात स्थानिक प्रशासनाला अधिकार देण्याचा विचार असल्याचेही त्यांनी सांगितले. ते माध्यमांशी बोलत होते..
आरोग्य मंत्री राजेश टोपे म्हणाले, की लसीकरणाच्या अफवांवर विश्वास ठेवू नये. लसीकरणाची सक्ती ( Rajesh Tope on corona vaccination ) नाही. तर ऐच्छिक आहे. संपूर्ण लसीकरण करून घेण्याची राज्याची तयारी ( Maharashtra gov ready to complete vaccination ) आहे.
लसीकरण करून घ्या-राजेश टोपे-
जिथे कोरोनाचे रुग्ण नाहीत, त्याठिकाणी शाळा सुरु कराव्यात अशी मागणी जोर धरू लागली आहे. खासदार सुप्रिया सुळे यांनीही शाळा सुरू करण्याची विनंती केली आहे. त्यामुळे येत्या बुधवारच्या कॅबिनेटमध्ये शाळेबाबत चर्चा होणार ( MH Cabinet discussion on school reopen ) आहे. स्थानिक प्रशासनाला अधिकार देण्याचा विचार आहे, असे टोपे यांनी म्हटले आहे. यासोबतच लसीकरण हे सक्तीचे नाही. ते ऐच्छिक आहे. लसीकरण करून घ्या, असे आवाहन टोपे यांनी केले आहे.
15 फेब्रुवारीपर्यंत राज्यातील शाळा व महाविद्यालय बंद
राज्यात कोरोना बाधिताची संख्या पुन्हा एकदा दिवसेंदिवस वाढत असल्यामुळे शासनाने शाळा, महाविद्यालये 15 फेब्रुवारीपर्यंत बंद ठेवण्याचा निर्णय घेतला आहे. ( Schools Closed in Maharashtra ) यामुळे विद्यार्थ्यांना परत 'ऑनलाइन'च्या माध्यमातून शिक्षण घ्यावे लागत आहे. ( Online Education in Maharashtra ) या निर्णयाचा शासनाने फेरविचार करावा, अशी मागणी मराठवाडा पदवीधर मतदारसंघाचे आमदार सतीश चव्हाण ( Marathwada Graduates Constituency MLA Satish Chavan ) यांनी मुख्यमंत्री उध्दव ठाकरे ( CM Uddhav Thackeray ) यांच्याकडे नुकतेच केली आहे.