जालना - विद्यार्थ्यांचे शैक्षणिक हित लक्षात घेऊन पहिली ते पाचवी पर्यंतचे वर्ग 1 फेब्रुवारी पासून सुरु करण्याचा राज्य सरकारचा मानस असल्याचे आरोग्यमंत्री राजेश टोपे ( rajesh tope on school opening ) यांनी सांगितले. जालन्यात त्यांच्या हस्ते ध्वजारोहण करण्यात ( Rajesh Tope flag hoisting in jalna ) आले यावेळी ते बोलत होते.
'दुसऱ्या डोसचं लसीकरण करून घ्यावे'
ब्रिटन आणि फ्रांसच्या प्रधानमंत्र्यानी आता आपल्याला कोरोना बरोबर राहायचे आहे असे म्हटले आहे. त्यामुळे या राष्ट्रापासुन बोध घेऊन आगामी काळात टास्क फोर्स आणि केंद्र सरकारच्या सुचनाचे पालन केल्या जाईल असेही टोपे यांनी म्हटले आहे. राज्य, समाज आणि स्वतःच्या सुरक्षिततेसाठी नागरिकांनी दुसऱ्या डोसचं लसीकरण करून घ्यावे असे आवाहन देखील आरोग्यमंत्री टोपे यांनी केले. कोरोनामुळे राज्याच्या तिजोरीवर आर्थिक ताण आल्याची कबुलीही टोपे यांनी दिलीय. कोरोनामुळे निर्बंध लावण्यात आल्यानं उद्योजकांना नुकसान होतय मात्र महसूल देखील कमी प्रमाणात जमा होत असल्याचे राजेश टोपे म्हणाले.
हेही वाचा - Anil Parab on ST Issue : एसटी विलिनीकरणाचा मुद्दा आमच्या हातात नाही - परिवहन अनिल परब