जालना - स्थानिक गुन्हा शाखेने अंबड शहरातील शीतल ट्रेडर्स या दुकानावर छापा टाकला. या छाप्यात शासनाने बंदी घातलेला सुंगधित प्रतिबंधित गुटका विक्री करताना दीपक भिकुलाल मंत्रीला ताब्यात घेण्यात आले. शहरात अन्य चार ठिकाणी टाकलेल्या छाप्यात एकूण ४ लाख ११ हजार रुपये किमतीचा गुटखा जप्त करण्यात आला आहे.
स्थानिक गुन्हे शाखेच्या पथकाला अंबड शहरात दिपक भिकुलाल मंत्री व अन्य काहीजण प्रतिबंधित गुटखा विक्री करत असल्याची माहिती मिळाली. त्यानुसार आज पोलिसांनी दोन पथके तयार करून छापा टाकला. यातील एका पथकाने श्री स्वामी समर्थ नगर अंबड येथील शीतर द्रेडर्स या दुकाची झडती घेतली. यावेळी दुकानांमध्येे सोळा प्रकारचे प्रतिबंधित तंबाखू, जर्दा असा २ लाखा ६६ हजार किमतीचा माल सापडला. वैधानिक इशारा न छापलेले विदेशी कंपनीचे वेगवेगळ्या ब्रँडचे १ लाख २४ हजारचे सिगारेटसुद्धा सापडले. या संदर्भात माहिती अन्न व औषध प्रशासनाला देन्यात आली. यानंतर अन्न औषध निरीक्षक प्रज्ञा सुरवसे यांनी अंबड पोलीस ठाण्यात तक्रार देऊन अन्न व सुरक्षा कायद्यांतर्गत गुन्हा दाखल केला.
दुसऱ्या पथकाने हरी ओम किराणा येथे छापा मारला. या वेळी नंदलाल लाहोटी सुगंधित गुटका विक्री करत असल्याचे समोर आले. त्यांच्याकडून 7 हजार 700 रुपयांचा गुटखा जप्त करण्यात आला. नूतन वसाहत आंबड येथे वशम करीम तांबोळी यांच्या घरातून 60 हजार 500 रुपयांचा गोवा गुटखा, नविन मोंढा येथील प्रल्हाद कुंडलिकवार जरडा यांच्या जय भवानी किराणा दुकानातून 1 हजार 300 रुपयांचा गोवा गुटखा, बलानगर अंबड येथील हकीम रशीद शेख यांच्या घरातून 3 हजार 500 रुपयांचा गुटका पोलिसांनी जप्त केला. पोलिसांनी पाच जणांकडून एकूण ४ लाख ११ हजार १७० रुपयांचा गुटखा जप्त केला.