ETV Bharat / state

प्रस्थापितांना हद्दपार करण्यासाठीच वंचितची निर्मिती - गोपीचंद पडळकर

वंचित आघाडी, ही कोणत्याही जाती धर्माच्या विरोधात नाही. मात्र, ज्यांनी गेल्या ७० वर्षांपासून वंचितांना वापरून घेतले. त्यांच्या मतावर निवडून आले, वंचितांना कधीही सन्मान दिला नाही, असेच या आघाडीच्या विरोधात आहेत, असे ते म्हणाले.

गोपीचंद पडळकर
author img

By

Published : Apr 12, 2019, 11:16 PM IST

जालना - मागील ७० वर्षांपासून महाराष्ट्रावर दोनशे घरांचेच राज्य चालू आहे. या प्रस्थापितांना सत्तेतून हद्दपार करण्यासाठीच वंचित बहुजन आघाडीची निर्मिती करण्यात आली आहे, असे सांगली लोकसभा मतदारसंघाचे उमेदवार तथा वंचित बहुजन आघाडीचे स्टार प्रचारक गोपीचंद पडळकर यांनी शुक्रवारी आंबड येथे म्हटले आहे.जालना लोकसभा मतदारसंघाचे वंचित बहुजन आघाडीचे उमेदवार डॉ. शरदचंद्र वानखेडे यांच्या जाहीर प्रचार सभेत ते बोलत होते.

गोपीचंद पडळकर यांचे भाषण

पडळकर म्हणाले, ठराविक घराण्यांनीच शासन चालवावे असे नाही. गेल्या ७० वर्षांपासून घराणेशाही चालू आहे. यामध्ये जावयाच्या, मुलाचा समावेश करून घेऊन आपली सत्ता टिकून ठेवण्याचे काम सुरू आहे. महाराष्ट्रामध्ये २०० घराण्याचीच सत्ता आहे. या प्रस्थापितांना राजकारणातून हद्दपार करण्यासाठीच बाळासाहेब आंबेडकर यांनी वंचित बहुजन आघाडीची निर्मिती केली आहे. वंचित आघाडी, ही कोणत्याही जाती धर्माच्या विरोधात नाही. मात्र, ज्यांनी गेल्या ७० वर्षांपासून वंचितांना वापरून घेतले. त्यांच्या मतावर निवडून आले, वंचितांना कधीही सन्मान दिला नाही, असेच या आघाडीच्या विरोधात आहेत, असे ते म्हणाले.

वंचितांना सत्तेत स्थान देण्यासाठी आणि त्यांना सन्मान देण्यासाठी वंचित आघाडीचे उमेदवार शरदचंद्र वानखेडे यांना निवडून द्या, असे आवाहनही त्यांनी केले. तसेच, सत्ताधारी हे सेवा करण्याची संधी मागत आहेत. या प्रस्थापितांना जर खरी सेवा करायची असेल तर त्यांनी पंढरपूरला जाऊन पांडुरंगाच्या दरबारात सेवा करावी, शिर्डीला जाऊन जेवणावळीतून पत्रावळी उचलाव्यात, ही खरी सेवा आहे, असा उपरोधिक टोलाही गोपीचंद पडळकर यांनी मारला.

यावेळी डॉ.वानखेडे यांचेही ही समयोचित भाषण झाले. व्यासपीठावर भारिपचे जिल्हाध्यक्ष तथा वंचित बहुजन आघाडीचे नेते दिपक डोके, गौतम खंडागळे, आदी उपस्थित होते.

Intro:गेल्या 70 वर्षांपासून महाराष्ट्रावर दोनशे घरांचेच राज्य चालू आहे या प्रस्थापितांना सत्तेतून हद्दपार करण्यासाठी वंचित बहुजन आघाडी ची निर्मिती करण्यात आली आहे .असे मत सांगली लोकसभा मतदारसंघाचे उमेदवार तथा वंचित बहुजन आघाडीचे प्रचारक गोपीचंद पडळकर यांनी आज शुक्रवार दिनांक 12 रोजी आंबड येथे व्यक्त केले.
जालना लोकसभा मतदारसंघाचे वंचित बहुजन आघाडीचे उमेदवार डॉ.शरदचंद्र वानखेडे यांच्या जाहीर प्रचार सभेत ते बोलत होते .यावेळी व्यासपीठावर डॉ. वानखेडे यांच्यासह विविध संघटनांचे व राजकीय पदाधिकारी उपस्थित होते.

Body:पुढे बोलताना गोपीचंद पडळकर म्हणाले की, ठराविक घराण्यांनीच शासन चालवावे असे नाही .पण गेल्या 70 वर्षांपासून घराणेशाही चालू आहे. यामध्ये जावयाचा मुलाचा,व्यह्याचा, समावेश करून घेऊन आपली सत्ता टिकून ठेवण्याचे काम सुरू आहे. महाराष्ट्रामध्ये दोनशे घराण्याचीच सत्ता आहे. या प्रस्थापितांना राजकारणातून हद्दपार करण्यासाठी वंचित बहुजन आघाडी ची निर्मिती बाळासाहेब आंबेडकर यांनी केली आहे .वंचित आघाडी ही कोणत्याही जाती धर्माच्या विरोधात नाही ,मात्र ज्यांनी गेल्या 70 वर्षांपासून वंचितांना वापरून घेतले, त्यांच्या मतावर निवडून आले, मात्र या वंचितांना कधीही सन्मान दिला नाही अशांच्या विरोधात ही आघाडी असून वंचितांना सत्तेत स्थान देण्यासाठी त्यांना सन्मान देण्यासाठी वंचित आघाडीचे उमेदवार शरदचंद्र वानखेडे यांना निवडून द्या असे आवाहनही त्यांनी केले .तसेच गेल्या 70 वर्षांपासूनसत्ताधारि हे सेवा करण्याची संधी मागत आहेत. या प्रस्थापितांना जर खरी सेवा करायची असेल तर त्यांनी पंढरपूरला जाऊन पांडुरंगाच्या दरबारात सेवा करावी, शिर्डी ला जाऊन जेवणावळी तून पत्रावळी उचलाव्यात ,ही खरी सेवा आहे असा उपरोधिक टोलाही गोपीचंद पडळकर यांनी मारला .
दरम्यान यावेळी डॉ.वानखेडे यांचेही ही समयोचित भाषण झाले व्यासपीठावर भारिपचे जिल्हाध्यक्ष तथा वंचित बहुजन आघाडीचे नेते दिपक डोके गौतम खंडागळे शिरसाट धी पदाधिकार्‍यांची उपस्थिती होती.

Conclusion:
ETV Bharat Logo

Copyright © 2024 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.