ETV Bharat / state

भाविकांना राम नवरात्रीला नवीन मंदिरात होणार श्रीरामाचे दर्शन - जालना

सद्यपरिस्थितीत राम लल्लाचे ५६ फूट अंतरावरून दर्शन घ्यावे लागते. भक्त आणि श्रीराम यांच्यातील हे अंतर कमी करून २५ फुटांवरून भाविकांना दर्शन मिळेल, असे किशोरजी व्यास यांनी सांगितले.

ayodhya temple jalna
राम मंदिर ट्रस्टचे कोषाध्यक्ष किशोरजी व्यास
author img

By

Published : Mar 10, 2020, 11:47 PM IST

जालना- अयोध्येमधील श्रीराम मंदिर ट्रस्ट स्थापन झाल्यानंतर आत्तापर्यंत एकच बैठक झाली आणि दुसरी बैठक आता ४ एप्रिलला आयोध्येमध्येच होणार आहे. तत्पूर्वी यावर्षीची राम नवरात्र नवीन मंदिरात साजरी होऊन भाविकांना राम लल्लाचे नवीन जागेत दर्शन होईल, अशी माहिती राष्ट्रसंत तथा अयोध्या राम मंदिर ट्रस्टचे कोषाध्यक्ष किशोर व्यास यांनी दिली.

माहिती देताना अयोध्या राम मंदिर ट्रस्टचे कोषाध्यक्ष किशोरजी व्यास

रोटरी क्लब ऑफ जालना रेनबोच्यावतीने शहरात तीन दिवसीय व्याख्यानमालेचे आयोजन करण्यात आले आहे. या व्याख्यानमालेच्या निमित्ताने किशोर व्यास आज जालन्यात आले आहेत. श्रीराम मंदिराच्या सद्यपरिस्थितीबाबत बोलताना किशोर व्यास म्हणाले की, पूर्वी ज्याप्रमाणे होते त्याच प्रमाणात आजही हे मंदिर आहे. मात्र, वर्षप्रतिपदेच्या आदल्या दिवशी प्रभू रामचंद्रांचे स्थलांतर सुरक्षित जागेत करावे आणि यंदाची राम नवरात्र नवीन मंदिरात साजरी व्हावी या हेतूने प्रयत्न सुरू आहेत. त्यामुळे भाविकांना यावर्षी राम लल्लाचे दर्शन नवीन स्थानी होईल.

त्याचबरोबर, सद्यपरिस्थितीत राम लल्लाचे ५६ फूट अंतरावरून दर्शन घ्यावे लागते, भक्त आणि श्रीराम यांच्यातील हे अंतर कमी करून २५ फुटांवरून भाविकांना दर्शन मिळेल. त्याचसोबत पहिल्यांदाच या परिसरात १०८ गोमाता नवरात्रात वास करणार आहेत. त्यानंतर ४ एप्रिलला अयोध्येतील राम मंदिर संदर्भात अयोध्येमध्ये विश्वस्तांची दुसरी बैठकही आयोजित करण्यात आली आहे, असे किशोर व्यास यांनी सांगितले.

हेही वाचा- कर्तबगार महिलांच्या कार्याला सलाम; संघर्ष फाउंडेशनच्या वतीने करण्यात महिलांचा सत्कार

ETV Bharat Logo

Copyright © 2025 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.