जालना Ganja seized In Kathora Bazaar : काठोरा बाजार येथील शेतकऱ्यानं तुरीच्या शेतात गांजाची लागवड केल्याची गुप्त माहिती पोलिसांना मिळाली होती. त्याआधारे पोलिसांनी याची माहिती पोलीस अधीक्षक शैलेश बलकवडे, भोकरदनचे उपविभागीय पोलीस अधिकारी डॉ. गणेश दराडे यांना कळवली. बलकवडे तसंच दराडे यांच्या मार्गदर्शनाखाली पारड पोलीस ठाण्याचे पोलीस निरीक्षक चैनसिंग गुसिंगे, पोलीस उपनिरीक्षक विलास डॉ. गुसिंगे, विजय आहेर, पो. कॉ. प्रकाश सिनकर, प्रदीप सरडे, भगतसिंग राजपूत, सुरेश पडोळ, शिवाजी जाधव, टेकाळेसह त्यांच्या सहकाऱ्यांनी गुरुवारी दुपारी या ठिकाणी छापा टाकला. या छाप्यात 23 क्विंटल गांजा पोलिसांनी जप्त केलाय. या प्रकरणी पोलिसांनी शेख गौस शेख सरदार पठाण रा. कठोरा बाजार यांच्यावर गुन्हा दाखल करण्याची प्रक्रिया सुरू केलीय.
23 क्विंटल गांजावर छापा : छापा टाकल्यानंतर मोठ्या प्रमाणात गांजाची झाडं आढळून आली. ही गांजाची रोपं तोडण्यासाठी पोलिस कर्मचाऱ्यांसह चाळीस मजुरांना गुरुवारी रात्री उशिरापर्यंत काम करावं लागलं. त्यानंतर ही रोपं दोन ट्रॅक्टरमध्ये पारड पोलिस ठाण्यात आणण्यात आली. शुक्रवारी दुपारपर्यंत पोलिसांनी सर्व गांज्याच्या रोपांचं मोठ्या गोडाऊनमध्ये वजन केलं. तेव्हा गांज्याच्या रोपांच वजन 23 क्विंटल आढळून आलं. या सर्व रोपांची किंमत 2 कोटी 30 लाख 13 हजार रुपये असल्याचं पोलिसांनी सांगितलंय.
अवैध धंदे करणाऱ्यांवर कारवाई : पारड पोलीस ठाण्यात झालेल्या पत्रकार परिषदेत उपविभागीय पोलीस अधिकारी डॉ. गणेश दराडे यांनी सांगितलं की, जिल्ह्यातील पारड पोलिसांची ही कौतुकास्पद कारवाई असून जिल्हा पोलिस अधीक्षक शैलेश बलकवडे यांनी 10 हजार रुपयांचं बक्षीस पोलिसांना जाहीर केलंय. पोलीस अधीक्षकांच्या मार्गदर्शनाखाली आम्ही विशेष मोहीम राबवत असून यामध्ये अवैध धंदे करणाऱ्यांवर कारवाई करण्यात येणार आहे.
हेही वाचा -